काशिद-कोपरला पाइपलाइन फुटली
By admin | Published: December 24, 2016 02:56 AM2016-12-24T02:56:32+5:302016-12-24T02:56:32+5:30
गुरुवारी कशिद कोपर येथे पाईपलाईन फुटल्याने वसई विरार परिसरातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
वसई : गुरुवारी कशिद कोपर येथे पाईपलाईन फुटल्याने वसई विरार परिसरातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून शनिवारपासून पाणी पुरवठा सुरु होणार असला तरी सुरळीत पाणी पुरवठा सुरु होण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
वसई विरार शहर महापालिका हद्दीत पाणीपुरवठा करणारी शंभर एमएलडी योजनेची गुरुत्वाहिनी गुरुवारी कशिद कोपर येथे फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला आहे. या योजनेची जलवाहिनी १५ वर्षे जुनी झालेली असल्यामुळे व त्यावर रस्ता बनवतेवेळी मोठ्या प्रमाणावर माती भराव करण्यात आला आहे. त्यामुळे सदर जलवाहिनी सध्याच्या रस्त्याच्या स्तरापेक्षा २२ फूट जमिनीखाली खोल गेलेली असल्याने कामाला वेळ लागत आहे. भौगोलिक स्थिती पाहता कामास विलंब होत आहे. (प्रतिनिधी)