विज्ञान प्रदर्शनात पी.जे. प्रथम
By admin | Published: December 24, 2016 02:34 AM2016-12-24T02:34:29+5:302016-12-24T02:34:29+5:30
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात पी. जे. हायस्कूल
वाडा : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात पी. जे. हायस्कूल आणि माध्यमिक गटात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा खुपरी द्वितीय, तर के. जी पाटील विद्यालय देवघर शाळेचा तृतीय क्र मांक आला असून माध्यमिक गटात पी. जे. हायस्कूल द्वितीय, लिटिल एंजेल्स इंग्लिश मिडीयम स्कूलचा तृतीय क्रमांक आला आहे. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्राथमिक गटात ७० तर माध्यमिक गटात ४३ प्रकल्प सादर केले.
वाड्यातील हरोसाळे येथील के. डी. ज्युनियर कॉलेजच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात हे प्रदर्शन भरविले होते. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद गटनेते नीलेश गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाडा पंचायत समितीच्या सभापती मृणाली नडगे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य जगन्नाथ पाटील, माधुरी पाटील, मेघना पाटील, अश्विनी शेळके निमितीचे संस्थापक नंदकुमार गंधे, योगेश गंध, बीडिओ कृष्णा जाधव हे उपस्थित होते. (वार्ताहर)