समुद्रकिनारी ताडबियांचे रोपण, पक्षी अभ्यासक, सर्पमित्रांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 11:15 PM2019-08-12T23:15:14+5:302019-08-12T23:15:57+5:30

चिखले समुद्रकिनाऱ्यावर ताडबीयांच्या रोपणातून पर्यावरण साखळीच्या मजबुतीसाठी स्थानिक, पक्षी निरीक्षक आणि सर्प, प्राणीमित्रांनी वृक्षारोपण कार्यक्र म केला.

Planting of seed's near sea face | समुद्रकिनारी ताडबियांचे रोपण, पक्षी अभ्यासक, सर्पमित्रांनी दिली माहिती

समुद्रकिनारी ताडबियांचे रोपण, पक्षी अभ्यासक, सर्पमित्रांनी दिली माहिती

Next

- अनिरुद्ध पाटील

बोर्डी : चिखले समुद्रकिनाऱ्यावर ताडबीयांच्या रोपणातून पर्यावरण साखळीच्या मजबुतीसाठी स्थानिक, पक्षी निरीक्षक आणि सर्प, प्राणीमित्रांनी वृक्षारोपण कार्यक्र म केला. यावेळी बोर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी रु पाली निकाथ आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य मनीष जोंधळकर यांनी या अभियानाचा उद्देश सांगितला. तर स्थानिक आणि परदेशातल्या स्थलांतरित पक्षांविषयीची माहिती पक्षी अभ्यासक आशिष बाबरे आणि प्रवीण बाबरे यांनी दिली. सर्प तसेच समुद्री पर्यावरणातील कासवांचे महत्त्व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य रेमंड डिसोझा, सागर पटेल यांनी सांगितले. आठ वर्षातील ताडिबया रोपणाच्या अनुभवा विषयी समुद्रकाष्ठ मित्र मंडळाचे अशोक गावड, उमेश चुरी यांनी माहिती दिली. त्यानंतर ताडबियांसह आणि विजय किणी, जयेश पाटील यांनी उपलब्ध केलेल्या जांभळाच्या रोपांची लागवड विद्यार्थी, महिला आणि पर्यावरण प्रेमींनीं केली.

स्थानिक पातळीवर ताडिबया उपलब्ध आहेत, त्यांची जमवाजमव करून योग्य जागेत रोपण केल्यास किनाºयाची धूप रोखणारी वृक्षराजी निर्माण करता येईल.
-भुपेंद्र गावड(स्थानिक )
 

Web Title: Planting of seed's near sea face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.