वसईत महापालिकेच्या वाचनालयाची दुर्दशा
By admin | Published: June 30, 2017 02:36 AM2017-06-30T02:36:31+5:302017-06-30T02:36:31+5:30
वसई विरारमहापालिकेच्या नवघर-माणिकपूर शहरात असलेल्या वाचनालयाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. वाचनालयाची इमारत गळकी
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई विरारमहापालिकेच्या नवघर-माणिकपूर शहरात असलेल्या वाचनालयाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. वाचनालयाची इमारत गळकी असल्याने सांडपाण्याची गळती लागलेली आहे. त्यातच प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. अशा स्थितीत वाचक आणि अभ्यासासाठी येणारे विद्यार्थी वावरत असल्याकडे शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
महाालिकेच्या डॉ. हेडगेवार सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. पुस्तकांसोबत सांडपाणी आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. तळजमला अधिक दोन मजली इमारतीतील शौचालयातील नळांना गळती लागल्याने पाणी थेट तळमजल्यापर्यंत येत आहे. त्यातच छप्पर गळके असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर झिरपून इमारतीत येत आहे. दुसऱ्या मजल्यावरील गळके पाणी आणि शौचालयाच्या दुर्गंधीमुळे संपूर्ण वाचनालयात एक प्रकारचा घाणेरडा असह्य वास पसरून राहिलेला आहे, अशी तक्रार गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली आहे.
वाचनालय इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा साथीच्या आजाराने विद्यार्थी व वाचकांच्या, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी भिती चेंदवणकर यांनी व्यक्त केली आहे.