भाईंदर पालिका भूखंड बीओटी तत्त्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 10:59 PM2019-08-08T22:59:33+5:302019-08-08T22:59:44+5:30

निविदा काढल्या, समाजबांधवांमध्ये नाराजी

The plot will be allocated on a BOT basis | भाईंदर पालिका भूखंड बीओटी तत्त्वावर देणार

भाईंदर पालिका भूखंड बीओटी तत्त्वावर देणार

googlenewsNext

मीरा रोड : आगरी समाजासाठी आगरी समाज उन्नती संस्थेला भाईंदरच्या आझादनगरजवळील सांस्कृतिक भवनाचा आरक्षित सहा हजार चौ.मी.चा भूखंड देण्याचा महासभेने ठराव केला आहे. मात्र, आता महापालिकेनेच हा भूखंड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर देण्यासाठी खुल्या निविदा मागवल्या आहेत.

आरक्षण क्र. १२२ हे सामाजिक वनीकरण आणि खेळाच्या मैदानासाठी असताना महापालिका, लोकप्रतिनिधी यांनी मात्र ते विकसित करण्यास कमालीची टाळटाळ चालवली आहे. टीडीआर देऊनही आरक्षणाच्या काही जागेत अतिक्रमण झाले आहे. मूळ आरक्षण विकसित केले जात नसतानाच सरकार, महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी मात्र आधी या आरक्षणात बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालन मंजूर केले. त्यापाठोपाठ याच जागेत आणखी एक सांस्कृतिक भवनचे १२२ अ हे सहा हजार चौ.मी.चे नवे आरक्षण अस्तित्वात आणले. परंतु, आगरी भवन म्हणून मंजुरीस सरकारने नकार दिला. त्यानंतर, महासभेने आगरी समाज उन्नती मंडळास आगरी समाजासाठी आरक्षणाची जागा नाममात्र वार्षिक १२ हजार रुपये भाड्याने देण्याचा ठराव केला.

महासभेचा ठराव आयुक्त बालाजी खतगावकर यांनी नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला. संस्थेला भाड्यात सवलत मिळावी म्हणून महापालिका नियमांचा संदर्भ दिला. भूखंड नाममात्र भाड्यात द्यायचा असेल, तर वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्यासाठीच देता येतो. त्यामुळे अडचणीत आलेल्या आयुक्तांनी नगरविकास विभागास सुधारित पत्र पाठवून भाड्याचा उल्लेखच काढून टाकला. लोकलेखा समितीच्या अहवालानुसार बाजारभावाने जागा भाड्याने देण्याच्या परिपत्रकाचे महासभा व आयुक्तांनी उल्लंघन केले. या भूखंडाची किंमत रेडीरेकनरनुसार १९ कोटी पाच लाख इतकी होत असल्याने सरकारी नियमानुसार जागा मूल्याच्या साडेपाच टक्के वार्षिक भाडे एक कोटी चार लाख इतके होत आहे. सरकारने अजूनही आयुक्तांनी पाठवलेल्या महासभेच्या प्रस्तावावर मंजुरी दिली नसताना दुसरीकडे महापालिकेनेच निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. सांस्कृतिक भवनचे आरक्षण विकसित करण्यासाठी संस्था, कंपनी आदींकडून जाहीर निविदा मागवल्या आहेत.

आगरी समाजाची राजकीय फायद्यासाठी फसवणूक व फरफट चालवली आहे. आम्ही सतत संस्थेला समाजाची नाचक्की आणि नुकसान करू नका म्हणून विनवणी करत आहोत. आगरी समाज भवन हे समाजाचा स्वाभिमान असताना सांस्कृतिक भवनसाठी राजकीय नेत्याच्या दावणीला समाज बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- अ‍ॅड. सुशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते
महासभेने आगरी समाज उन्नती संस्थेचा केलेला ठराव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यावर, अजून कोणते निर्देश आलेले नाहीत. परंतु, नगरविकास विभागाशी चर्चा केल्यानंतर सांस्कृतिक भवनसाठी निविदा मागवल्या आहेत. - बालाजी खतगावकर, आयुक्त

Web Title: The plot will be allocated on a BOT basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.