कवी, समीक्षक गणेश वसईकर यांच्या अकाली निधनाने वसईच्या साहित्यक्षितिजावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:59 PM2021-05-23T21:59:05+5:302021-05-23T22:01:39+5:30
Corona Virus news Ganesh Vasaikar: दोन्ही मुला - मुलीचं आई वडिलांचं छत्र हरवलं. 26 एप्रिल 2021 या दिवशी त्यांची पत्नी जागृती वसईकर यांचेही कोरोना आजाराने निधन झाले आहे.
- आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : महाराष्ट्राचे कवी, तथा वसईतील समीक्षक गणेश वसईकर यांचे शनिवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते मागील दीड महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते.
धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या आधीच, दि 26 एप्रिल 2021 या दिवशी त्यांची पत्नी जागृती वसईकर यांचेही कोरोना आजाराने निधन झाले आहे. आता त्यांचा पूर्णांक (वय 15) हा एक मुलगा आणि एक मुलगी युगा (वय 20) यांच्या डोक्यावरून मातृ आणि पितृ असे दोन्ही छत्र एकदम हरवले आहे.
तर विरार आगाशी येथे त्यांचे दोन भाऊ आहेत. गणेश वसईकर यांच्या जाण्याने मराठी साहित्य क्षेत्राचे आणि वसईतील साहित्य चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे तर दोन्ही मुलांचे छत्र हरवल्यानं वसईत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे