वृद्ध आईला केली पोलिसांनी मदत, मुलांना इशारा : पालनपोषण करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 10:41 AM2021-09-09T10:41:01+5:302021-09-09T10:41:50+5:30
वडपाडा येथील जीवी चैत्या पडेर या ६५ वर्षीय वृद्धेला चार मुले आहेत. ही मुले वृद्ध आईसोबत नेहमी भांडण करत सांभाळ करण्यासाठी टाळाटाळ करीत
जव्हार : जव्हार तालुक्यातील जामसर वडपाडा येथील एका वृद्धेला तिच्या मुलांनी घरातून काढून टाकले होते. तिला राहण्यासाठी घर नव्हते, ही बाब कळताच जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी घरच्यांशी संपर्क साधून वृद्धेला त्यांच्या घरी पाठवले. तसेच वृद्धेला साडी व ब्लाऊज घेऊन माणुसकीचे दर्शन घडवले.
वडपाडा येथील जीवी चैत्या पडेर या ६५ वर्षीय वृद्धेला चार मुले आहेत. ही मुले वृद्ध आईसोबत नेहमी भांडण करत सांभाळ करण्यासाठी टाळाटाळ करीत. त्यांनी आईला घराबाहेर काढल्याने वृद्ध महिला फिरत होती.
छत गेल्यामुळे वृद्धेवर संकट कोसळले होते. अखेर लेंगरे यांनी त्यांच्या दोन मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून सज्जड दम दिला व तिचा सांभाळ करून पालनपोषण करा, असे सांगितले. तसेच तिला एक नवीन साडी व ब्लाऊज खरेदी करून दिले.