पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्यात खांदेपालट , ३४ अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:35 AM2018-06-13T03:35:56+5:302018-06-13T03:37:43+5:30
पालघर जिल्हा पोलीस दलातील ३४ अधिका-यांच्या सोमवारी रात्री उशिरा जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
पालघर - जिल्हा पोलीस दलातील ३४ अधिका-यांच्या सोमवारी रात्री उशिरा जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली करण्यात आलेल्या अधिका-यांमध्ये ६ पोलीस निरीक्षक, १४ सहायक पोलीस निरीक्षक आणि १४ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांचा समावेश असून पैकी अन्य ६ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून पालघर पोलीस दलात बदली झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिका-यांनी दिली आहे. तसे लेखी आदेशही पारित करण्यात आले असून बहुतांश अधिकाºयांनी मंगळवारी आपल्या नेमणुकीच्या जागी पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान अलीकडेच पालघर पोलिस दलातील ६ पोलीस अधिकाºयांचा जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना जिल्ह्याबाहेर बदलीचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार त्या रिक्त झालेल्या जागी आता पालघर पोलीस दलात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्हा पोलीस दलातून ६ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.
परंतु पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी बाहेरील जिल्ह्यातून दाखल होणाºया अधिकाºयांच्या नेमणुका आणि याच जिल्ह्यातील ६ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांची बदली करून त्यांना तात्पुरता पदभार देवून जिल्ह्यातील पोलीस अधिकाºयांची खांदेपालट केल्याने पुन्हा एकदा अधिकारी वर्गाला यानिमित्ताने धक्का दिला आहे, त्याबाबतचे स्वतंत्र लेखी आदेश त्यांनी सोमवारी रात्री उशिरा पारित केले आहेत.
एकूणच तात्पुरत्या बदली म्हणून नियुक्त्या झालेल्या अधिकाºयांना सध्या तरी त्यांच्या नव्या नेमणुकीच्या जागी हजर होण्याचे आदेश दिले असले तरी त्यांना नवीन बदली आदेशाबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती हि पालघर पोलिस प्रशासनाने दिली आहे. बदल्यांचा हा पहिला हप्ता असून यापुढे आणखीही काहींच्या बदल्या होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी लोकमतशी बोलतांना वर्तविली आहे. त्यामुळे अधिकाºयांचे डोळे आता पुढील बदली आदेशाकडे लागले आहेत.