पोलीस अधीक्षकांनी टाळले ३ खून, कुटुंबाचे घडविले मनोमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:47 AM2017-11-21T02:47:00+5:302017-11-21T02:47:37+5:30
पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी त्याला बोलण्यात तासभर गुंगवून अधिकाº्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्या कुटुंबाचे समुपदेशन करून संपूर्ण कुटुंबाला वाचविण्यात यश मिळविले.
हितेंन नाईक
पालघर : मी खूप संकटात आहे, माझे संतुलन ढासळत असल्याने मी माङया पत्नीसह माङया दोन्ही मुलींचा गळा कापणार असल्याचा एका साठ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीचा मेसेज आल्या नंतर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी त्याला बोलण्यात तासभर गुंगवून अधिकाº्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्या कुटुंबाचे समुपदेशन करून संपूर्ण कुटुंबाला वाचविण्यात यश मिळविले.
नालासोपारा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील एका गृह संकुलात राहणाºया व एअर इंडियामधून सेवानिवृत्त झालेल्या साठ वर्षीय व्यक्तीचा मी जीवनाला कंटाळलो असून मी आता माझ्या पत्नीसह दोन्ही मुलींचा गळा कापून खून करणार असल्याचा मेसेज पोलीस अधीक्षक कार्यालयाने फेसबुक वर बनविलेल्या पालघर पोलीस पेजवर येतो.आणि या पेजवर सक्रीय असलेले पोलीस उपनिरीक्षक हेमंत काटकर हे त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब याची कल्पना ते पोलीस अधीक्षकांना देतात. त्यातील गांभीर्य समजून त्यांनी काटकर ह्यांना सदर व्यक्तीस बोलण्यात गुंगवून ठेवण्याची सूचना दिली. त्यानुसार अधिकाधिक वेळ त्या व्यक्तीस बोलण्यात, मेसेज मध्ये गुंगवून ठेवल्या नंतर नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव ह्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
मी सेवानिवृत्त झाल्या नंतर मला माझी पत्नी मला महत्व देत नाही, मुलीही चांगली वागणूक देत नसल्याचे त्या व्यक्तींनी पोलिसांना सांगितले. तर हे सेवानिवृत्त झाल्यापासून घरात एकही पैसा देत नसून दोन्ही वेळेला दारू पीत असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांकडे केली. त्यामुळे घरात उभी राहिलेली कटुतेची भिंत पाडून सर्व कुटुंबाला पुन्हा एकत्र बांधण्याचे कौशल्य पो.नि. जाधव ह्यांना दाखवायचे होते. त्यांनी दोन दिवस पती-पत्नी, त्यांच्या दोन्ही मुली ह्यांच्याशी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये समुपदेशानाद्वारे बातचीत सुरू ठेवून त्यांना जीवनाचे महत्व पटवून दिले. त्यांनाही आपल्या चुका समजल्या. सर्वांनी आता आपल्यातील संघर्ष संपवून चांगले आयुष्य जगू, असा शब्द त्यांनी आपल्याला दिल्याची माहिती पो. नि जाधव ह्यांनी लोकमतला दिली. पोलीस अधीक्षक सिंगे व त्यांच्या अधिकाºयाने कार्यतत्परता दाखविल्याने या कुटुंबात घडणारी मोठी शोकांतिका टळली व हे कुटुंब आनंदाने एकत्र राहणार असल्याने वेगळेच समाधान मिळाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
>आम्हाला त्या जेष्ठ व्यक्तींचा फोन आल्यानंतर 14 व्या मिनिटात आमची टीम त्यांच्या कडे पोचली.आम्हाला ट्विटर,फेसबुक ह्या सोशल मीडिया द्वारे लोकांनी तक्र ार अथवा आपल्या समस्या मांडल्यास आम्ही त्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करू.
- मंजुनाथ सिंगे,
पोलीस अधीक्षक, पालघर