अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची दमछाक

By admin | Published: October 11, 2016 02:35 AM2016-10-11T02:35:48+5:302016-10-11T02:35:48+5:30

महाराष्ट्र गुजरात तसेच दिव-दमणच्या सीमेवर सूरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू पोलीस ठाण्यात एक दोन नव्हे तर

Police torture due to insufficient manpower | अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची दमछाक

अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची दमछाक

Next

शौकत शेख / डहाणू
महाराष्ट्र गुजरात तसेच दिव-दमणच्या सीमेवर सूरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू पोलीस ठाण्यात एक दोन नव्हे तर तब्बल शंभर पोलीसांची कमतरता असल्याने डहाणू शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून दिवसा ढवळया घरफोडी, तसेच दुकानदारांना भर रस्त्यात लुटण्यांच घटना वाढत आहेत. शिवाय अपूऱ्या मनुष्यबळामुळे रोजच्या रोज होणारे मोर्चे, आंदोलने, पेट्रोलिंग, नाकाबंदी तसेच राकीय घडमोडी इत्यादी साठी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना तारेवरची कसतर करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी लागत आहे.
डहाणू-चर्चगेट लोकल सेवा सुरू झाल्याने झपाटयाने लोकसंख्या वाढत असलेल्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण ही वेगाने वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात पोलीस बळ कमी पडत आहे. मुंबईपासून केवळ १२० कि.मी. अंतरावर असलेले उहाणू पोलीस ठाण्याच्या १२३ चौ. कि.मी. अंतर्गत येत असलेल्या २८ गावे व शंभर पाड्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी डहाणू पोलीस ठाण्यात अधिक पदे र्मिाण करणे गरजेचे असतांना सध्या असलेली पदे ही रिक्त आहेत.
रिक्तपदांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, महिला पोलीस, या पदांचा समावेश आहे.
डहाणू पोलीस ठाण्यात सन २०१० नुसार १५५ मनुष्यबळाची गरज आहे. परंतु सध्या या पोलीस ठाण्यात केवळ ५५ अधिकारी, कर्मचारी वर्ग असल्याने दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरफोडी, बलात्कार, विनयभंग, हाणामारी इ. कडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे येथे अपूऱ्या मनुष्यबळामुळे येथील उपलब्ध पोलीसांना चोवीस तास डयूटी करूनही इमरजेन्सीमध्ये बोलावून घेतले
जात असल्याने पोलीस
ताण तणावाखली असल्याचे दिसून येते.
दरम्यान, नुकतेच डहाणूच्या रामवाडी भागात काही अज्ञात चोरटयांनी दिवसा ढवळया दोन घरफोड्या करून त्यातील सुमारे दोन लाखाचे दागिने चोरून पलायन केले. तर डहाणूच्या इराणी रोड येथे सध्याकाळच्या सूमारस दुकानबंद करून मोटारसायकल वरून जात असतांना काही अज्ञात चोरटयांनी दुकानदाराच्या हातातून तीन लाख रूपये असलेली बॅग हिसकावून पळ काढल्याने येथील व्यापरीवर्गात खळबळ उडाली आहे. तर अनेक दिवस झाले तरी पोलीसांना गुन्हेगार सापडत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Police torture due to insufficient manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.