हप्ते वसुलीची चित्रफित काढणाऱ्या युवकास पोलिसाची पट्ट्याने मारहाण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:18 AM2018-04-04T06:18:10+5:302018-04-04T06:18:10+5:30
अवैध रित्या होणारी वाहतूक रोखण्याची जबाबदारी असणाºया पोलिसांकडून चिरीमिरीच्या मोहाने केला जाणारा कानाडोळा येथील एका जागृक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतांना हप्तेबाज पोलीसांनी त्याला चौकीत नेवून पट्ट्याने मारहाण करुन केलेले रेकॉर्डिंग डिलिट करायला लावण्याचा प्रकार झाला आहे.
- हुसेन मेमन
जव्हार - अवैध रित्या होणारी वाहतूक रोखण्याची जबाबदारी असणाºया पोलिसांकडून चिरीमिरीच्या मोहाने केला जाणारा कानाडोळा येथील एका जागृक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतांना हप्तेबाज पोलीसांनी त्याला चौकीत नेवून पट्ट्याने मारहाण करुन केलेले रेकॉर्डिंग डिलिट करायला लावण्याचा प्रकार झाला आहे. या मोगलाई विरोधात आदिवासी समाज एकवटला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
३० मार्च रोजी सकाळी साडे आकराच्या सुमारास पाथर्डीनाक्यावरील कुलदिप हॉटेळ समोर पोलीस शिपाई मुंडे याने जीप मालकाकडून वर्दीचा बडगा दाखवून हप्ता वसूली केली. नेमका हा प्रकार तेथे उभा असणारा नितीन सोमनाथ किरकिरा याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान, आपले बिंग फुटणार असल्याने मुंडे याने त्याला धमकावत केलेली व्हिडिओ शुटींग डिलिट करायला भाग पाडेले.
हा प्रकार येवढ्यावरच थांबला नसुन दंडेली करणाºया पोलीसाने त्यास तब्बल चार तास चौकीमध्ये डांबून पट्ट्याने मारहाण केली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ रामखिंड गावातील आदिवासी संघर्ष समितीने मुंडे यास अटक करण्यासाठी जव्हार पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्यासंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच मंगळवारी एस.पी. मंजुनाथ सिंगे यांना निवेदनाची प्रत दिल्याचे किरकीरा यांनी सांगितले.
हेच का सद्रक्षणाय...
मुंडे सोबत एक पोलीस कर्मचारी पण होता, या दोघांची कसून चौकशी करून त्यास त्वरीत निलंबित करण्यात यावे, त्यांना शासन झाले नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू, पोलीस हप्ते वसुली करतांना व्हिडीओ काढून चोरी पकडून देतो म्हणून, एका युवकास पोलीस ठाण्यात आणून एखाद्या आरोपी सारखे पट्ट्याने मारतात ही बाब पोलीस स्टेशनला लाजीरवाणी आहे, त्यामुळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत गावकर्यांनी मिळून घडलेला सर्व प्रकार जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भोये यांना सांगितला. मात्र, त्यांनी दखल घेतलेली नसून हप्तेखोर पोलीसाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही जिल्हा पोलीस अधिक्षक यांनाही तक्र ार केली आहे.
- सोमनाथ किरकीरा, वडिल
पालकमंत्री आल्याने बंदोबस्त होता. मुंडे यांनी जीप वाल्यांना गाड्या इतरत्र पार्क करण्याच्या सुचना केल्या. त्याचा राग मनामध्ये धरुन सगळा बनाव रचण्यात आला आहे. नितीन किरकीरा या युवकास मारहाण केलेली नसून चौकीमध्ये त्यास समज देवून सोडण्यात आले होते.
- डी. पी. भोये, पोलीस निरीक्षक