राजकारणाचा सारीपाट बदलणार? आघाडीत माकपाचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:53 AM2019-03-18T03:53:25+5:302019-03-18T03:54:13+5:30

अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़ या निवडणुक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

 Political change will change? The CPI (M) claimed in the alliance | राजकारणाचा सारीपाट बदलणार? आघाडीत माकपाचाही दावा

राजकारणाचा सारीपाट बदलणार? आघाडीत माकपाचाही दावा

Next

विक्रमगड: अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़ या निवडणुक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे़ त्याप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या सैन्यांची जमवाजमन सुरु केली आहे़
निवडणुकीच्या या युध्दांत अंबारीसह हत्ती सजले आहेत़ मात्र उमेदवारांनी अधिकृतपणे युध्दांच्या प्रारंभाचा शंखध्वनी अजुनही वाजविलेला नसल्याने कोणत्यापक्षाकडुन कोणता उमेदवार रणांगणात उतरणार आहे़ त्यांची नुसती चर्चा सुरु आहेत. पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीअंतर्गत वाटयाचे मतदारसंघ आणि बदलाच्या हालचालींची चर्चा जोराने वेग घेते आहे़ त्यामुळे राजकारणाचा सारीपाट बदलणार आहे़
लोकसभेसाठी युतिकडुन शिवसेनेलाच पालघरची जागा सोडली असल्याचीच चर्चा मतदारांमध्ये आजही होतांना दिसत आहे़ श्रीनिवास वनगा हे या जागेसाठी उमेदवार असतील़ परंतु मागील पोट निवडणुकीत भाजपाकडुन २९ हजार ५७२ मतांनी निवडुन आलेले खासदार राजेंद्र गावित हे या निर्णयावर नाराज असुन त्यांनी जड अंतकरणाने मागील पोटनिवडणुकीत कॉगे्रसला राम राम करत भाजपमध्ये प्रवश केलो होता़ मात्र, आता हाता तोेंडाशी आलेला घास निसटत असल्याने त्याची परिस्थिती ही ‘ना घर का ना घाट’ का अशी झाली आहे. आघाडीत माकपाचाही लोकसभेच्या जागेवर दावा तर दुसरीकडे कॉग्रेस सीपीएम, राष्टÑवादी व बहुजन विकास आघाडी यांची युतीची चर्चा ही जोरात आहे़ व त्यानुसार आघाडीकडुन पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला सोडली असल्याची चर्चा असली तरीही या जागेवर आघाडीत येणाऱ्या माकपानेही दावा केला आहे़ त्यामुळे हे बेरेजेचे गणित सोडविणे आता कठीण बनले आहे़ पोटनिवडणुकीत माकपाचे किरण गहला यांना ७१हजार ८८७ मते मिळाल होती त्यामुळे बिघाडी सुरु आहे.

पोट निवडणुकीत उमेदवरांना मिळालेली मते

उमेदवार पक्ष मिळालेली मते
राजेंद्र गावित भाजपा २७२७८२
श्रीनिवास वनगा शिवसेना २४३२१०
बळीराम जाधव बविआ २२२८३८
किरण गहला माकप ७१८८७
दामोदर शिंगडा कॉग्रेस ४७७१४
संदिप जाधव ६६७०
शंंकर बदादे ४८८४
नोटा १६६४४

Web Title:  Political change will change? The CPI (M) claimed in the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.