नऊ ग्रामपंचायतींसाठी २५ फेब्रुवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:38 AM2018-02-06T02:38:31+5:302018-02-06T02:38:35+5:30
मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ९ ग्रामपंचायतींची सरपंचपदासंह सर्व सदस्यांची निवडणूक तसेच १२० रिक्त पदांची पोटनिवडणूक घोषित झाली.
पालघर : मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ९ ग्रामपंचायतींची सरपंचपदासंह सर्व सदस्यांची निवडणूक तसेच १२० रिक्त पदांची पोटनिवडणूक घोषित झाली असून त्यासाठीचे मतदान २५ फेब्रुवारीला होणार आहे.
जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी, विक्रमगड तालुक्यातील चाबके, तलावली, पालघर तालुक्यातील सरावली, खैरेपाडा, शीलटे, माहीम तर डहाणू तालुक्यातील चिंचणी, चारोटी व दाभाडी या संपूर्ण ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहेत. पाच फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु होणार असून १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ती सुरु राहील. त्यांची छाननी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरु होणार आहे.
अर्ज मागे घेण्याची तारीख १५ फेब्रुवारी असून निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच उमेदवाराची अंतिम यादीही याच दिवशी घोषित होणार आहे. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर २७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार
आहे.
सरपंचांची निवडणूक थेट पद्धतीने होणार असल्याने तिच्यात यंदा अधिक चुरस असणार आहे.
>उडणार तारांबळ
ग्रामपंचायतींच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सवलतीस शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ नंतर मुदतवाढ न मिळाल्यामुळे ही निवडणूक आरक्षित पदांवर लढविणाºया उमेदवारांना अर्जासोबत सक्षम प्राधिकाºयाने दिलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १०-१ अ नुसार अनिवार्य राहणार आहे.
या निवडणूक संदर्भात अर्ज भरण्यापासून ते निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या भागात इंटरनेटची कनेक्टीव्हीटी नाही तेथील उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.