कंपन्यांच्या प्रदूषणाची तपासणी, पाणेरी शुद्धीकरण मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:25 AM2019-01-10T05:25:03+5:302019-01-10T05:25:21+5:30

पाणेरी शुद्धीकरण मोहिम : जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीचे कामकाज सुरू

Pollution checking of companies, Panieri Purification Campaign | कंपन्यांच्या प्रदूषणाची तपासणी, पाणेरी शुद्धीकरण मोहिम

कंपन्यांच्या प्रदूषणाची तपासणी, पाणेरी शुद्धीकरण मोहिम

Next

हितेन नाईक

पालघर : पाणेरी नदीच्या प्रदूषणाचे नेमके मूळ शोधण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी नियुक्त केलेल्या समितीने आपल्या कामकाजाला सोमवार पासून सुरु वात केली असून बिडको व अन्य औद्योगिक वसाहती मधील एकूण 46 रासायनिक उत्पादने घेणाºया कंपनीची अंतर्गत पाहणीचे काम सुरू केले आहे.

माहीम ग्रामपंचायत हद्दीतील पाणेरी नदीत काही कंपन्यांचे व पालघर नगरपरिषदेचे प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे. या नदीच्या पाण्यावर काही वर्षांपूर्वी लगतचे बागायतदार, शेतकरी मोठे उत्पन्न घ्यायचे. मात्र सध्या ही नदी काळी-पिवळी पडली असून शेतकºयांच्या विहिरी, बोअरवेल आदीचे पाणी प्रदूषित होऊन शेती व बागायतीवर विपरीत परिणाम झाला असून किनारपट्टीवरील खाड्या प्रदूषित झाल्या आहेत. नदीच्या परिसरातील लोकांना श्वसनाच्या विविध आजारासह त्वचारोगाने ग्रासले आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाणेरी बचाव संघर्ष समितीसह अनेकांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पाणेरी नदीत प्रदूषित पाणी सोडणाºया कंपन्यांच्या यंत्रणांची प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी एक समिती नेमली आहे.

उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांच्या अध्यक्षतेखाली माहीम-वडराईचे ग्रामस्थ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूरचे उपप्रादेशिक अधिकारी डॉ.अर्जुन जाधव, मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी रमेश उंद्रे, सरपंच दीपक करबट, वडराई मच्छिमार संस्थेचे चेअरमन मानेद्र आरेकर यांच्या समितीची बैठक झाली. ती मध्ये पाणेरी नदीत प्रदूषित पाणी सोडणाºया कंपन्यांची तपासणी व सर्वेक्षण करून १५ जानेवारी पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश गजरे यांना दिले आहेत. या सर्व कंपन्यांच्या तपासणीचे काम सोमवार पासून हाती घेण्यात आले असून कंपन्या मधील सद्यस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी डॉ.अर्जुन जाधव यांनी दिली.

तपासणी साठी निवडलेल्या कंपन्यांची नावे.
1) प्रेमको ग्लोबल प्रा.ली.(अल्याळी) 2) खंडेलवाल रेझिन(अल्याळी)
3) संदीप इंडस्ट्रीज(अल्याळी) 4) विपुल डाय केमिकल(अल्याळी), 5) रेन्यूमेड फार्मास्युटीकल्स (अल्याळी) 6) मेहता पेट्रो रिफायनरी(माहीम) 7) नोबल इंडस्ट्री(माहीम), 8) जयश्री केमिकल्स (आल्याळी) 9) सिरॉन ड्रग्स अँड फार्मास्युटीकल्स (आल्याळी), 10) मृणाल सिंथेटिक इंडस्ट्री पालघर(आल्याळी), 11) क्र ाफ्ट वेअर प्रा.ली. (आल्याळी), 12) हिंदुस्थान लॅबोरेटरीज (आल्याळी), 13) हाऊस होल्ड रेमेडीज (आल्याळी), 14) वीरा फार्मा प्रा.ली. (आल्याळी), 15) ब्लिज जीव्हीएस फार्मा प्रा.ली. (आल्याळी), 16) ब्लिज जिव्हीएस फार्मा प्रा.ली. (आल्याळी), 17) ब्लिज जिव्हीएस फार्मा प्रा.ली. प्लॉट 12 (आल्याळी), 18)मे.मेघानी इंटरप्रायजेस (माहीम), 19) आयुशक्ती आर्युवैदिक प्रा.लि.(माहीम), 20) मायक्र ोबार प्रा.ली.(माहीम), 21) आर्या औषधी फार्मा.(माहीम), 22) मेट्रो इंडस्ट्रीज प्रा.लि.(माहीम), 23) शिवा पेट्रो सिंथेटिक (माहीम), 24) डेल्स लॅबोरेटरीज प्रा.लि. (माहीम), 25) पी एम.इलेक्ट्रो आॅटो प्रा.लि(माहीम), 26) आॅस्टॉनिक स्टील प्रा.लि. (माहीम), 27) निशांत आरोमस प्रा.लि.(माहीम), 28) डेल्स रेमेडिज प्रा.लि.(माहीम), 29) ए वाय एम सिंटेक्स प्रा.लि.(माहीम), 30) आर्यन सिंटेक्स प्रा. लि. (माहीम), 31) गोल्डविन मेडिकेअर प्रा.लि. (माहीम), 32) मॅकलोडस फार्मास्युटीकल्स (माहीम), 33) मेडिको रेमेडीज प्रा.लि.(माहीम), 34) मेटल इंडिया प्रा.लि.(माहीम), 35) वायर क्र ाफ्ट प्रा.लि. (आल्याळी), 36) मनोरमा टेक्स्टाईल प्रा.लि (आल्याळी), 37) तुरिकया टेक्स्टाईल प्रा.लि. (चिंतू पाडा), 38) श्री राघवेंद्र कोटींग प्रा.लि.(आल्याळी), 39) मेटॅलिका ट्यूब अँड पाईप प्रा.लि. (माहीम), 40) स्टार अ‍ॅप्लायन्सेस प्रा.लि. (आल्याळी), 41) एक्सल फार्मास्युटीकल्स प्रा. लि. (आल्याळी) 42) पालघर कॉइल प्रा.लि. (आल्याळी), 43) तेजस इलेक्ट्रो प्लेटर्स प्रा.लि. (माहीम), 44) मालिनी मेटल्स प्रा.लि.(माहीम), 45) ड्यूरीअन केमिकल्स प्रा.लि.(माहीम) 46) सत्यकी केमिकल्स प्रा.लि. (माहीम)
 

Web Title: Pollution checking of companies, Panieri Purification Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.