काही वर्षांपासून किनाऱ्याची धूप : प्रकल्पांमुळे निसर्गावर घातला जाणार घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:42 PM2019-09-29T23:42:31+5:302019-09-29T23:42:58+5:30

पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो.

pollution in dahanu beach | काही वर्षांपासून किनाऱ्याची धूप : प्रकल्पांमुळे निसर्गावर घातला जाणार घाला

काही वर्षांपासून किनाऱ्याची धूप : प्रकल्पांमुळे निसर्गावर घातला जाणार घाला

googlenewsNext

डहाणू/बोर्डी : पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो. काही वर्षांपासून किनाºयाची धूप, बेकायदा बांधकाम यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून हा प्रश्न संवेदनशीलपणे न हाताळल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

उत्तर कोकणातील डहाणू हा तालुका राज्याच्या सागरी पर्यटनाचे कोंदण म्हणून ओळखला जातो. रुपेरी वाळू, कधी दगडी तर कधी अथांग किनारा, सुरू, कांदळवनाची हिरवी भिंत, चिकू आणि माडांची झालर यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तर समुद्रातील मासे आणि मोसमी फळांची मेजवानी मिळत असल्याने विविध पर्यटन हंगामात दरवर्षी पर्यटक दाखल होतात.

कृषी उत्पादने आणि फळ प्रक्रिया उद्योगासह बागायतीच्या जोडीला इको टूरिझमची जोड देऊन हॉटेलिंग व्यवसायाची पाळेमुळे पसरू लागली आहेत.

तरूण पिढी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन या व्यवसायात उतरली आहेत. पूर्वी जवळच्या मुंबई आणि गुजरातच्या शहरातून येणारे पर्यटक आता देश-विदेशातून येऊ लागले आहेत. वाळूशिल्प, तारपा, घोरनृत्य, दशावतार, वेगवेगळ्या यात्रा आणि चिकू महोत्सवासारख्या इव्हेंटमधून पर्यटन व्यवसायाला झळाळीच आली आहे.

असे असताना मोठ्या प्रमाणात समुद्रातून होणा-या रेती चोरीमुळे किनाºयाची हानी आणि धूप होऊन दरवर्षी शेकडो झाडे जमीनदोस्त होतात. समुद्रातील तेल गळतीने तवंग पसरून विद्रुपीकरण होते. कायदा पायदळी तुडवून भराव टाकल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकारण हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पर्यावरणाचा बळी घेतला जात असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात येऊ घातलेले विविध प्रकल्प आणि उद्योगधार्जिण्या धोरणाचा हट्ट काही मोजक्या घटकांनी धरल्याने समृद्ध असलेले पर्यावरण टिकवायचे कसे? जर तसे झाले तर पर्यटन व्यवसायाला परिणाम भोगावे लागतील.

डहाणू समुद्र किना-यावर जी सुरूची झाडे आहेत ती चोरट्या वाळू उपशामुळे भरतीच्या लाटेत उन्मळून पडू लागली आहेत. प्रशासकीय यंत्रणेचे असलेले अभय व अनास्थेमुळे किनारे बकाल होऊ लागले आहेत. त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारे असणे आवश्यक आहे. डहाणू तालुका पर्यावरण दक्षता प्राधिकरणामुळे अंकुश राहिला आहे. हे प्राधिकरण हटविण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे. यामुळे पुढे डहाणूतील स्थानिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.
- प्रवीण ना. दवणे, पर्यावरण अभ्यासक

Web Title: pollution in dahanu beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.