मातीच्या ढिगाऱ्याने अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 05:55 AM2019-02-22T05:55:01+5:302019-02-22T05:55:19+5:30
डहाणू नगर परिषदेचे दुर्लक्ष : ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा नागरिकांचा आरोप
बोर्डी : डहाणू नगरपरिषदे अंतर्गत काटी रोड ते इराणी रोड दरम्यान पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र काम पूर्णत्वास आल्यानंतर मुरु म व भरावाचा थर व्यविस्थत न बुजल्याने अपघातसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
सृजल निर्मल ही पाणीपुरवठा योजना १२ प्रभागाकरिता राबविली आहे. २०१४-१५ साली वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता २३ कोटी निधी प्रस्तावित होता. परंतु तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळविण्यात विलंब झाल्याने प्रत्यक्षात काम २०१७ साली सुरू झाले. दरम्यान, विकासकाम पूर्णत्वास येऊनही रस्ता व्यवस्थित बुजविण्यात आलेला नाही. काही ठिकाणी मुरूम ओबडधोबड पसरविल्याने उंचसखल भाग तयार झाला आहे. त्याचा त्रास पादचाºयांना होतो. तर खोदकामावेळी काढलेल्या ढिगाºयामुळे रस्त्याकडेची जागा अडली जाऊन वाहतूक कोंडीची समस्या उदभवते आहे. मनपाने दुर्लक्ष केल्यामुळेच ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा परिस्थितीतही ठेकेदाराला ७० टक्के देयक का देण्यात आली अशी विचारणा होऊ लागली आहे. त्याचा ठपका प्रशासनावर ठेवला जात आहे.
अशी परिस्थिती कुठेकुठे आहे ?
च्डहाणू रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडल्यावर उत्तरेला इराणी रोड तर दक्षिणेला काटी रोड आहे. या मार्गावर ही जलवाहिनी टाकण्याकरिता खोदकाम काम झाले. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर ते व्यविस्थत बुजविने आवश्यक होते. याकरिता रस्त्याच्या उंचीच्या समांतर मुरूम किंवा काँक्र ीट टाकणे अपेक्षित होते.
च्परंतु मुरूम-माती जैसे थे असल्याने रस्ता ओबडधोबड बनला आहे. हा शहरातील मुख्य बाजाराचा परिसर आणि रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग आहे. तथापि माणसांची वर्दळ आणि वाहनांची संख्याही सर्वाधिक असते. त्यामुळे नेहमीच अपघातसदृश्यिस्थतीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय हे पर्यटनाचे शहर म्हणून ओळखले जाते.
च्परंतु रस्त्याचा दर्जा सुमार असल्याने वाहतूक कोंडी पाचवीला पुजली आहे. त्यापैकी काही भाग विक्र ेत्यांनी काबीज केला आहे. तथापि यापेक्षा ग्रामपंचायतीचे रस्ते बरे अशी प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. तर या रस्त्यावरील माती वा मुरु म तत्काळ उचलून हा अडथळा दूर केला जाईल असे ठेकेदार घुले यांनी सांगितले.