गवराईपाड्यातील पोस्ट आॅफिस व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:13 AM2017-10-30T00:13:46+5:302017-10-30T00:14:00+5:30

औद्योगिक वसाहतीसह तब्बल दहा गावांना सेवा देणाºया गवराई पाडा पोस्ट आॅफिसच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

On the post office ventilator in the grassroots | गवराईपाड्यातील पोस्ट आॅफिस व्हेंटिलेटरवर

गवराईपाड्यातील पोस्ट आॅफिस व्हेंटिलेटरवर

Next

शशी करपे
वसई : औद्योगिक वसाहतीसह तब्बल दहा गावांना सेवा देणाºया गवराई पाडा पोस्ट आॅफिसच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मोडकळीस असलेल्या इमारतीत कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. तर नागरीकांना कार्यालयात जाण्याचीही भीती वाटत आहे.
गवराईपाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून एका पडक्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे पोस्ट आॅफिस सुरु आहे. ही इमारत अगदी जीर्ण झाली आहे. पहिल्या मजल्याचे सुरक्षा कठडे गायब झाले आहेत. ते नसल्याने येता-जातांना भीती वाटते. खिडक्याही तुटलेल्या आहेत. सिलिंगचा स्लॅब कोसळलेला आहे. जिन्याच्या पायºया तुटलेल्या आहेत. इमारतीचे प्लॅस्टर निखळून पडलेले आहे. त्यातून गंजलेल्या शिगा बाहेर डोकावतांना दिसतात. इमारतीचे पीलरही कमकुवत झाले आहेत. इमारतीच्या चोहोबाजूला उगवलेले गवत आणि वाढलेल्या झाडाझुडूपांमुळे हे पोस्ट आॅफिस की भूत बंगला असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. जीर्ण अवस्थेमुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. या पोस्ट आॅफिसमधून वसईतील मोठ्या औद्योगिक वसाहतीसह गवराईपाडा, गोखीवरे, कामण, ससूनवघर, राजावली, पेल्हार, जुचंद्र, सातीवली, वालीव परिसरात सेवा दिली जाते. शासकीय कागदपत्रांसह खाजगी टपाल आजही पोस्ट आॅफिसमधूनच पाठविले जाते. त्यासाठी या टपाल कार्यालयात एक पोस्ट मास्तर, दोन शिपाई, एक सहाय्यक, पंधरा पोस्टमन, आठ ब्रँच पोस्टमन कार्यरत आहेत. मोठ्या औद्योगिक वसाहतीमुळे याठिकाणी नेहमी मोठी वर्दळ असते. या पोस्टात सर्वसामान्यांनी केलेल्या मोठ्या गुंतवणूकीचे रेकॉर्ड ठेवलेले आहे. त्याचीही सुरक्षा धोक्यात आलेली आहे. अनेकदा पोस्टात मोठी रोकडही ठेवलेली असते. तिच्या सुरक्षेबाबतही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इमारतीच्या दुरुस्तीसाठी कर्मचाºयांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. पण, कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यानंतरच इमारतीची दुरुस्ती करणार का असा सवाल येथील कर्मचारी व पोस्टाचे ग्राहक करीत आहेत.

Web Title: On the post office ventilator in the grassroots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.