राज्य निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार महापालिकेची निवडणुक प्रकिया राबविण्यास स्थगिती" - मुंबई उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 03:43 PM2020-10-27T15:43:15+5:302020-10-27T15:43:21+5:30
Vasai Virar Election: समीर वर्तक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- आशिष राणे
वसई : राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार शहर महापालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीची एकूणच प्रकिया राबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दुपारी झालेल्या सुनावणी वेळीं या प्रक्रियेला स्थगिती आदेश दिल्याची माहिती देत पुढील सुनावणी दि.29 ऑक्टोबर म्हणजे च येत्या गुरुवारी होणार असल्याचे ही याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी लोकमतला दिली.
अर्थातच एन कोविड काळात निवडणूक आयोगाच्या विरोधात जाऊन याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने तीन सुनावण्या अंती हा ऐतिहासिक निर्णय दिल्याने वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुका बाबत आता पुढील काळात बरीच रंगत वाढणार आहे.
दरम्यान समीर वर्तक यांनी वसई विरार महापालिका प्रशासना तथा निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचने बाबत दोष त्रुटी व काही सूचनाही आयोगाला आयुक्तांच्या मार्फत केल्या होत्या मात्र निवडणूक आयोगाने 17 पैकी केवळ एकच हरकत मान्य करीत इतर सर्वच्या सर्व हरकती फेटाळून लावल्याने वर्तक यांनी महापालिका सहीत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आणि दि.12 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष याचिका क्रं.94014/2020 ही दाखल करत वसई विरार महापालिका प्रशासनाने व त्याचे आयुक्त, राज्य निवडणूक आयोग,कोकण विभागीय आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी आदींना प्रतिवादी केलं होतं.
परिणामी उच्च न्यायालयात पहिली सुनावणी दि.15 ऑक्टोबर ला पार पडली तर दुसरी सुनावणी त्यानंतर दि.22 ऑक्टोबर रोजी पार पडली मात्र दोन्ही वेळी राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सुनावणीसाठी गैरहजर राहिले,किंबहुना निवडणूक आयोगाने आमची प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे सांगितले तर नंतर आम्हाला नोटीसच मिळाल्या नाही असा युक्तिवाद केला मात्र याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी सर्व प्रतिवादीना नोटिसा ई-मेल द्वारे पोहचवल्याचे पुराव्या सहीत उच्च न्यायालयात स्पष्ट केल्याने 22 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचना कार्यक्रम पूर्ण झाला असे म्हणत असतील तर तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले मात्र दोन वेळा सांगून आदेश करून ही राज्य निवडणूक आयोगाने आजवर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणी वेळी स्पष्ट शब्दांत राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करीत नाही तोपर्यंत वसई विरार महापालिकेची निवडणुक प्रकिया राबविण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयांने आदेशात म्हंटले असून पुढील सुनावणी दि.29 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे वर्तक यांनी सांगितले.
याचिकाकर्ते समीर वर्तक यांनी उच्च न्यायालयात
WRITT PETITION NO 94014/2020 दि.12 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या याचिके बाबतीत आजवर घडलेल्या ठळक घडामोडी
15 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी, महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश,
दि. 20ऑक्टोबर रोजी सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश.
दि.22ऑक्टोबर राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात याचिकेची कॉपी मिळाली नसल्याचे सांगितले.
आणि अखेर तिसऱ्या सुनावणीत दि.27 ऑक्टोबर राज्य निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश व तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती.
पूू ढी ल सु ना व नी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी होणार.