फटके खाऊन होतो पोतराजांचा उदरनिर्वाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:56 AM2017-12-27T02:56:11+5:302017-12-27T02:56:14+5:30

विक्रमगड : स्वत:चे शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत स्वत:च्याच हाताने त्यावर आसूडाचे फटके मारून पोट भरणारा समाजघटक म्हणजे पोतराज आज जग बदलले असलेतरी त्यांचे आयुष्य मात्र जसे होते तसेच आहे.

Potters eat food | फटके खाऊन होतो पोतराजांचा उदरनिर्वाह

फटके खाऊन होतो पोतराजांचा उदरनिर्वाह

Next

राहुल वाडेकर
विक्रमगड : स्वत:चे शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत स्वत:च्याच हाताने त्यावर आसूडाचे फटके मारून पोट भरणारा समाजघटक म्हणजे पोतराज आज जग बदलले असलेतरी त्यांचे आयुष्य मात्र जसे होते तसेच आहे. ढोलक्याच घुमणं, परंपरेने चालत आलेला देवीचा देव्हारा आणि चाबूक सारे काही तेच आहे.
गावोगावी भटकंती करुन उपाशी तापाशी अवस्थेत आपली भक्ती सादर करुन दिवसभरात मिळालेल्या दक्षिणेतून संध्याकाळी कोठेतरी ठिय्या देवून चूल पेटविली जाते आणि पोट भरण्याची सोय केली जाते. जर पुरेशी दक्षिणा मिळाली नाही तर उपाशी पोटी झोपावेही लागते. त्याचे कुटुंब डोक्यावर देवीचा देव्हांरा घ्ेऊन दारोदारी पोटासाठी भटकंती करीत असते. आज या गावी तर उद्या दुसºया गावी असा त्यांचा नित्यक्रम आठ महिने चालत असतो़ मात्र पावसाळयात हे लोक आपल्या गावी असतात़
सध्या विक्रमगडमध्ये असलेल्या व नाशिक जिल्ह्यातील वणी येथून आलेले पोतराजाचे कुटुंब सध्या विक्रमगड-जव्हार परीसरात मुक्कामी आहे. पत्नी, १० वर्षाचा मुलगा व आपल्या अंगावर आसुड ओढणारा पोतराज असे हे कुटुंब आहे.
आम्ही भिकारी नाही, आम्ही आईचे सेवेकरी आहोत. आमचाही मान आहे. परंतु आता हे आजच्या पिढीला माहिती नाही त्यामुळे ते आमच्याकडे भिक्षेकरी म्हणून पाहतात. कोणी आम्हांस देवीवाला म्हणतात, कुणी म्हणतात जरीमरीवाला आला, तर कुणी अंगावर आसुड ओढणारा देवीचा भगत आला असे म्हणतात. देवीच्या भक्तांनी आम्हांला अनेक नांवे दिली असली तरी शासन दरबारी आमची कोणत्याही प्रकारची नोंद नाही. त्यामुळे आम्हांला आतापर्यत शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागले आहे़ आम्हांला आमच्याच गावाकडे राहाण्याकरीता गरीबीमुळे धड घरही नाही, उदरनिर्वाहासाठी जमीन जुमला नाही, कर्ज घेऊन धंदा करावयाचा तर त्यासाठी आमचेजवळ आवश्यक ती कागदपत्रे नाहीत, शिक्षण नाही त्यामुळे पोटापाण्यासाठी पावसाळयाचे चार महिने वगळता उर्वरीत आठ महिने असे बिºहाड पाठीवर घेऊन कुटुंबासह डोक्यावर देवीचा देव्हारा घेऊन, गावोगावी भटकंती करावी लागते.
आमच्या बरोबर मुला-बाळांनाही शिक्षण सोडून ऊन, थंडीवाºयात खस्ता खात फिरावे लागते़ त्यांना त्यांच्या बालपणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ त्यांना शिक्षणापासून दूर सारणे आमच्या मनालाही पटत नाही पण आमचे जीवनच भटकंतीचे असल्याने त्याला दुसरा पर्याय नसल्याने हे सर्व पोटासाठी करावे लागत असल्याची खंत आण्णा नारायण पवार व त्यांची पत्नी सकुबाई आणि आसुडाचे फटके अंगावर ओढणारा १२ वर्षाचा मुलगा धोंडीबा या पोतराजांनी व्यक्त केली़
>वर्षातील आठ महिने सुरु असते अशी परवड
पावसाळा संपण्याच्या वेळी साधारणपणे दसºयाच्या आठ दिवस आम्ही आमचे घरदार व गाव सोडून जगण्यासाठी म्हणुन बरोबर निवडक सामान घेऊन निघतोे़ पहाटे सूर्योदयापूर्वी मुलाबाळांच्या जेवणची सोय करुन सकाळी घरातील कर्ती महिला डोक्यावर जरीमरी देवीचा देव्हांरा ठेऊन व खांद्याला घुमणे अडकऊन जवळच्या गावात निघतो़ गावाच्या सीमेवर येताच दोन्ही हातातील काठीच्या सहाय्याने ढोलकीतून घुमण्याचा आवाज काढतो़ हातातील आसूडाचे अंगावर फटके ओढतो.
त्या आवाजाने महिला, मुली पोरेबाळे पोतराज पाहण्यास धान्याने भरलेली वाटी व एकदोन रुपये घेऊन आमची वाट पाहत उभे असतात यातूनच या भागातील महिला या धार्मिक असल्याचे समजल्यावर आम्ही त्या ठिकाणी देवीचा कार्यक्रम करतो़ त्यावेळी महिला नारळ ओटी भरतात तर काही नवस बोलतात़ जे मिळेल ते खुशीने घेतो़ कोणाकडेही जादा पैशांची मागणी करीत नाही़ तसा आमचा पोतराजांचा नियमच आहे़ एकदोन कार्यक्रम करुन दिवसाला शंभर-दोनशे मिळतात़

Web Title: Potters eat food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.