वीज सतत खंडित : विक्रमगडकर संतप्त

By admin | Published: June 2, 2016 01:13 AM2016-06-02T01:13:00+5:302016-06-02T01:13:00+5:30

पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

Power continuously breaks: Vikramgadar gets angry | वीज सतत खंडित : विक्रमगडकर संतप्त

वीज सतत खंडित : विक्रमगडकर संतप्त

Next

विक्रमगड : पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
काही भागात रात्रभर वीज गायब असत तर काही भागात प्रकाश डिम असतो. गेल्या दोन दिवसांपासून पाच पाच मिनीटांनी वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात,तर रात्री-बे रात्री वीज खंडित होतच असते.त्यातच दुरुस्तीच्या नावाखाली दर शुक्रवारी वीज बंद ठेवली जाते. या काळात महावितरण कोणते काम करते? कामे करते तर मग असे प्रकार का घडतात. वीजपुरवठ्यात सातत्य का नाही.अगोदरच कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होते. पाणीपुरवठा धड नाही. व रात्रीची झोप ही मिळत नाही.त्यामुळे ग्रामस्थांमधून महावितरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . सहन तरी किती करायचे असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. महाविरणने पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरु असल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी ती रेंगाळल्याचे चित्र आहे.त्यामुळेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. जोरात वारा सुटल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरेक्षेचा उपाय म्हणून अगर पोल पडल्याने, झाडे लाइनवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो.शिवाय सध्या महावितरणकडून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध कामे हाती घेतली गेली आहेत.त्यामुळे आधीच दुरुस्ती व ही कामे करण्याच्या नावाखाली वीजपुरवटा बंद ठेवला जात आहे. अधूनमधून नेहमीच वीज जात असल्याने कार्यालयीन कामांवरही परिणाम होत आहे. या लपंडावामुळे शीतपेये व थंड वस्तंंूंची विक्री करणा-या दुकानदारांचे ही हाल होत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Power continuously breaks: Vikramgadar gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.