इस्रायलच्या राजदूतांकडून प्रगतीच्या कार्याचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:58 PM2019-06-21T22:58:57+5:302019-06-21T22:59:58+5:30
इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांचा मुलांशी आणि कृषी प्रशिक्षणार्थींशी संवाद
जव्हार : इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिंकलस्टाईन यांच्यासह दूतावासातील निमरोड काल्मर, मिशेल जोसेफ, डॉ. अनुजा पांढरे आणि अनय जोगळेकर या अधिकाऱ्यांनी बुधवारी जव्हार आणि मोखाडा येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यात इस्रायल कशाप्रकारे योगदान देऊ शकेल, या उद्देशाने भेट दिली.
प्रथम त्यांनी वाघ्याची वाडी येथील ‘बोर्लोफ इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशिया’च्या (बीआयएसए) पाठिंब्याने सुरू असलेल्या आधुनिक अशा कृषी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर वाघ गावातील जल व्यवस्थापन आणि सौरपंप प्रकल्प, तसेच खोच गावातील तलावातील मत्स्यपालन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली. तसेच जव्हारमधील कर्णबधीर मुलांच्या शाळेलाही इस्रायल दूतावासातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन मुलांबरोबर आणि कृषी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
याकोव्ह फिंकलस्टाईन यावेळी म्हणाले की, ‘‘प्रगती प्रतिष्ठानसारख्या तळागाळात काम करणाºया संघटना जे काम इस्रायलने आपल्या स्थापनेवेळी केले तसेच काम करीत आहेत. इथे येऊन शेती, जल व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण विकासात इस्रायलचा दीर्घ अनुभव आपल्याशी शेअर करतांना आनंद होत आहे,’ असे सांगतानाच ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या अधिकाºयांनी स्थानिक शेतकºयांना शेतीविषयक नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबासाठी ‘इंडो-इस्रायल सेंटर्स आॅफ एक्सलन्स’ला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या महोत्सवात निरनिराळ्या देशांतील खाद्यपदार्थांचे प्रदर्शन वेगवेगळ्या देशांच्या दूतावासांकडून ठेवले जाते,.