प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:12 AM2017-10-06T01:12:16+5:302017-10-06T01:12:31+5:30
एसटी बस चालकाच्या प्रसंगावधनाने सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना वाघोबा खिंडीत घडली आहे. अवघड वडणावर स्वत:च्या प्राणाची बाजी लाऊन बसचा ताबा मिळवल्याने पुढील मोठा अपघात टळला आहे.
नंडोरे (पालघर): एसटी बस चालकाच्या प्रसंगावधनाने सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना वाघोबा खिंडीत घडली आहे. अवघड वडणावर स्वत:च्या प्राणाची बाजी लाऊन बसचा ताबा मिळवल्याने पुढील मोठा अपघात टळला आहे.
एसटी महामंडळाची पालघरहुन ठाणेकरीता जाणारी प्रवाशांनी भरलेली बस ही वाघोबा खिंडीत उतारावर धबधब्यांनाजीक आली असता अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याचे चालकाच्या लक्षात येऊन त्याच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार बुधवारी घडला. बसमध्ये ठाण्याच्या प्रवाशांसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करीत होते.
एसटी बसचालकाने डाव्या बाजुकडील खिंडीतील उतारावरील गटारात रस्त्यालगत पुढचे चाक उतरवली. त्यामुळे बस समोर असलेल्या झाडावर आदळून थांबवली.
या अपघातात प्रवाशाना कुठलीही दुखापत झाली नाही. बस थांबवण्याच्या या प्रयत्नात चालकास किरकोळ जखमा झाल्या. यावेळी बसमधील सर्व प्रवाशांनी वाहन चालकाचे आभार मानले. वाघोबा खिंडीत उताराची अशी बरीचशी मोठी वळणे आहेत. या वळणावर रस्त्याच्या कडेला अपघात रोधक कठडे बसविणे गरजेचे असताना ते बसवले गेले नाहीत. याच रोधक कठड्यांमुळे बसही त्याला आदळून थांबली असती.