प्रशांत पाटलांचा उद्या भाजपाप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:46 AM2018-05-13T06:46:33+5:302018-05-13T06:46:33+5:30
बहुजन विकास आघाडीत कार्यरत अनेक लोकोपयोगी कार्यानी तो आपल्या पक्षाला बळकटी देण्याचा प्रामाणकि प्रयत्न करीत अ
हितेंन नाईक
पालघर : बहुजन विकास आघाडीत कार्यरत अनेक लोकोपयोगी कार्यानी तो आपल्या पक्षाला बळकटी देण्याचा प्रामाणकि प्रयत्न करीत असतांना पद्धतशीरपणे पंख छाटले गेल्याने व अनेक वर्षांपासून होत असलेली घुसमट असह्य झाल्याने शेवटी बविआ चे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील ह्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व १४ मे रोजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पालघर मध्ये त्यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.
तालुक्यातील राजकारणात ज्या बहुजन विकास आघाडी चे नाव तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील ह्या नावा भोवती फिरत राहिले होते. त्यानी ८ महिन्यांपूर्वी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. आपल्या अनेक लोकोपयोगी कार्यांनी ते बविआला बळकटी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे पंख छाटले गेल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरु होती.
वसई तालुका सोडला तर इतर तालुक्यात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला सहजा सहजी इथला मतदार स्वीकारायला तयार नसल्याचे अनेक निवडणुकांच्या निकालावरून दिसून आले आहे. बोईसर मतदार संघातून निवडून येणारे आमदार विलास तरे ह्यांच्या विधानसभा क्षेत्रात वसई तालुक्यातील एक भाग येत असला तरी प्रशांत पाटलांनी ग्रामीण भागात बांधलेली मतदारांची मोट आणि आपल्या कुणबी समाजातील मतदारांना बहुजन आघाडीशी बांधून ठेवण्याचे कसब त्यांनी दाखवून दिले होते. त्यामुळे आमदार विलास तरे ह्यांच्या विजयासह जिल्हापरिषद, पंचायत समित्या आणि अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकात तालुकाध्यक्ष पाटील यांच्या कर्तृत्वाचाही वाटा असल्याचे कोणी नाकारू शकणार नाही. तालुक्यातील कोणात्याही समाजाच्या सुख-दु:खात सहभागी होत आम्ही तुमच्या सोबत आहोत ही दाखविलेली आपुलकी त्याच्या व पक्षाच्या वाढी साठी अनेक वेळा फायदेशीर ठरलेली होती.