लोकलमधून पडलेल्या महिलेचे वाचले प्राण, रेल्वे स्टेशनमधील घटना सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 05:43 AM2017-09-10T05:43:25+5:302017-09-10T05:43:27+5:30
धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने प्लॅटफार्म आणि लोकल ट्रेनच्यामध्ये फरफटत जात असलेल्या एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे काम आरपीएफच्या एका अधिका-याने केले.
वसई : धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने प्लॅटफार्म आणि लोकल ट्रेनच्यामध्ये फरफटत जात असलेल्या एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे काम आरपीएफच्या एका अधिकाºयाने केले. महिलेला मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर काढतानाची दृश्ये रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
लता महेश्वरी असे महिला प्रवाशाचे नाव असून गोपाळकृष्ण राय असे तिला वाचवणाºया कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर घडली. आदल्या रात्री विरार रेल्वे स्टेशनमध्ये पैशांसाठी एका तरुण महिला प्रवाशाला धावत्या लोकलमधून बाहेर ढकलले गेल्याचा प्रकार ताजा असतानाच दुसºया दिवशी मात्र नालासोपाºयात एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे काम आरपीएफच्या पोलीस अधिकाºयाने केले. बोरीवली येथील महेश्वरी आपल्या मुलीसोबत नालासोपाºयाहून बोरीवलीला निघाल्या होत्या. मुलगी लोकलमध्ये चढली. मात्र, महेश्वरी लोकल गाडी सुरु झाल्यानंतर चढण्याचा प्रयत्न करीत असताना पाय घसरून गाडीसोबत फरफटत जाऊ लागल्या. गाडीने वेग घेतल्यानंतर त्या प्लॅटफार्म आणि गाडीच्या मध्ये सापडल्या होत्या. प्लॅटफार्मवर असलेले प्रवाशी जीवन-मरणाचा हा खेळ पहात जागीच स्तंभ झाले होते. पण, रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या राय यांनी मात्र बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान साधून महेश्वरी यांना वाचवण्यासाठी धाव घेतली.
मृत्यूच्या मुखातून बाहेर
गाडीने वेग पकडलेला आणि महेश्वरी अक्षरश: मृत्युच्या दाढेत लोटल्या जात असताना राय यांनी हिंमत दाखवून महेश्वरी यांना खेचून बाहेर काढले. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने महेश्वरी यांना सुखरुप बाजूला करण्यात आले. महेश्वरी अक्षरश: मृत्युच्या जबड्यातून बाहेर पडल्या होत्या. हा थरार स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महेश्वरी या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना मानसिक धक्काही बसला आहे.