प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:14 AM2018-09-29T04:14:18+5:302018-09-29T04:14:30+5:30
पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शुक्र वार, २८ सप्टेंबर रोजी थर्मल पॉवर स्टेशनच्या सभागृहात झाला. यावेळी तालुकास्तरीय अकरा आणि राज्य व जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षकांना गौरविण्यात आले.
डहाणू/बोर्डी - पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शुक्र वार, २८ सप्टेंबर रोजी थर्मल पॉवर स्टेशनच्या सभागृहात झाला. यावेळी तालुकास्तरीय अकरा आणि राज्य व जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षकांना गौरविण्यात आले.
दरम्यान जिल्हास्तरीय पेक्षा तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन सरस झाल्याचे सांगून जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या व्यवस्थापन पद्धतीवर टीका करून, २००५ नंतर सेवेत रुजू कर्मचार्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळविण्यासह शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन, पुरस्कार प्राप्त व उपस्थित शिक्षकांचे खासदार राजेंद्र गावित यांनी अभिनंदन केले. शिवाय शिक्षकांनी व्यसनमुक्त व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
त्यानंतर लितका बिपीन राऊत (बोर्डी केंद्र, तलईपाडा), मंगला भूपेंद्र हाडळ (चिखले, वडकती), स्मिता जयेश माळी (मल्याण, वडकून पाटीलपाडा), वैशाली अनिल मोरे (पळे, गावठण), संदीप भालचंद्र म्हात्रे(चिंचणी, तणाशी), ज्युलिना कमा काकड (आशागड, आसवे सावरपाडा), अशोक निवृत्ती तळेकर(गंजाड, दळवीपाडा), अनिता बापू महाकाळ (कासा), राजेश लक्ष्मण बोरसा (चारोटी, बसवतपाडा), महादू रडका लहांगे (दापचारी) आणि रमेश धर्मा वाघदडा (सायवन, वाघातपाडा) या अकरा शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. तर तालुक्यातील राज्य पुरस्कार विजेत्या स्मिता विकास पाटील(वाणगाव, ज. म. ठाकूर विद्यालय) तसेच जिल्हा पुरस्कार विजेते दीपक देसले(घोलवड, टोकेपाडा) यांनाही शाल-श्रीफळ, रोपटे व ग्रंथ, सन्मानचिन्ह देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराची नोंद सेवा पुस्तिकेत होणे आवश्यक आहे असे मत संदीप म्हात्रे यांनी मांडले.