डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाची तयारी जोरात

By admin | Published: September 28, 2016 02:56 AM2016-09-28T02:56:47+5:302016-09-28T02:56:47+5:30

डहाणूतील प्रसिध्द महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाची तयारी ट्रस्टींकडून सध्या मोठया उत्साहात सुरु आहे. येत्या १ आॅक्टोबरपासून उत्सव सुरू होणार आहे.

Preparation of Navratri festival at Dahanu's Mahalaxmi temple is loud | डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाची तयारी जोरात

डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाची तयारी जोरात

Next

कासा : डहाणूतील प्रसिध्द महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाची तयारी ट्रस्टींकडून सध्या मोठया उत्साहात सुरु आहे. येत्या १ आॅक्टोबरपासून उत्सव सुरू होणार आहे.
घटस्थापनेच्या दिवशी देवीची विशेष पूजा, आरती सकाळी होते, मंदिराची विशेष सजावट नवरात्र उत्सव कालावधित केली जाते. देवी नवसाला पावते असा भाविकांचा दृढ विश्वास असल्याने पालघर जिल्हयातील भाविकाबरोबर, वापी, सुरत व मुंबईतील भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात. भाविकांच्या दर्शन सुविधेसाठी मंदिर स्ट्रस्ट विशेष खबरदारी घेतली जात असून पक्के तीन रॅलिंग शेड तयार केले असून उत्सव दरम्यान तात्पूरती रॅलिंग व्यवस्था केली जाणार आहे.
नवरात्रउत्सव कालावधीत मंदिरात व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत असून मंदिराच्या दर्शनी भागात हार, फुलांची मोठी सजावट केली जाते. ही फुले नाशिकमधील दानशूर भाविक तानाजी नामाडे गेल्या दोन वर्षापासून पाठवितात.
मंदिर परिसरात व ट्रस्ट कार्यालयासमोर मंडप उभारले जात आहेत. उत्सव कालावधीत नऊ दिवस देवीला विविध रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात. (वार्ताहर)

- नवरात्रौत्सव कालावधीत भाविकांची गर्दी लक्षात घेत भाविकांच्या सुरक्षा व सोईसुविधेसाठी पोलीस बंदोबस्तासोबत मंदिराकडून ४० सुरक्षारक्षक ठेवण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी सांगितले. तसेच सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिरात व मंदिर परिसरात सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Web Title: Preparation of Navratri festival at Dahanu's Mahalaxmi temple is loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.