महापालिका रुग्णालयात चिटो-यावर प्रिस्क्रिप्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:57 AM2017-08-18T02:57:58+5:302017-08-18T02:58:02+5:30
महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर साध्या छोट्याशा चिटो-यावर औषधांची नावे लिहून ती ठराविक मेडिकल स्टोअर्समधूनच विकत घेण्याचा आग्रह रुग्णांना करीत असल्याचा धक्कादायक प्रकार आमची वसईने उजेडात आणला आहे.
वसई : वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर साध्या छोट्याशा चिटो-यावर औषधांची नावे लिहून ती ठराविक मेडिकल स्टोअर्समधूनच विकत घेण्याचा आग्रह रुग्णांना करीत असल्याचा धक्कादायक प्रकार आमची वसईने उजेडात आणला आहे. यावर महापालिकेच्या अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाºयांनी मौन बाळगले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आमची वसईने रुग्णमित्र सेवा सुरु केली असून रु ग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट होत असल्याचा प्रकार पुराव्यानिशी उजेडात आणला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधे दिली जातात. त्यासाठी पुरेसा साठाही उपलब्ध असतो, असे वैद्यकीय अधिकारी सांगत असतात. पण, त्यांचे म्हणणे खोटे असल्याचे ढगे यांनी केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे.
महापालिकेने प्रिस्क्रीप्शन पॅड दिलेली नसल्याने साध्या कागदावर औषधे लिहून द्यावी लागत असल्याचे रु्ग्णालयातील डॉक्टर सांगत आहेत. मात्र, याप्रकरणी अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी मात्र काही बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधे देणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच डॉक्टरांनीही अशा पद्धतीने औषधे लिहून देणे गुन्हा आहे. पण, महापालिकेकडूनच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. म्हणूनच महापालिकेकडे प्रिस्क्रीप्शन पॅड छापण्यास निधी नसेल तर
आमची वसई सामाजिक समुह महापालिकेला पॅड छापून देण्यास तयार आहे, असे रु्ग्णमित्र राजेंद्र ढगे यांचे म्हणणे आहे.
>कट प्रॅक्टीस चालत असल्याचा संशय
महापालिकेच्या बहुतेक रुग्णालयात डॉक्टर प्रिस्क्रीप्शन पॅडवर औषधे लिहून देण्याऐवजी साध्या कागदावर लिहून देत असतात. त्यावर धक्कादायक बाब म्हणजे सदर औषधे ठराविक खाजगी मेडिकल स्टोअर्समधूनच खरेदी करण्याचे रुग्णांना सांगिलते जात असल्याचेही ढगे यांनी उजेडात आणले आहे.