सातपाटी मच्छिमार संस्थेचा गौरव

By admin | Published: April 30, 2017 03:49 AM2017-04-30T03:49:16+5:302017-04-30T03:49:16+5:30

सोलापूर येथे राज्यशासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे देण्यात येणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार सातपाटीच्या मच्छीमार सहकारी संस्थेला राज्यपाल विद्यासागर

The pride of Satpati Fisheries Organization | सातपाटी मच्छिमार संस्थेचा गौरव

सातपाटी मच्छिमार संस्थेचा गौरव

Next

पालघर : सोलापूर येथे राज्यशासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे देण्यात येणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार सातपाटीच्या मच्छीमार सहकारी संस्थेला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचा स्वीकार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतीपर्वातील धेय्यवादी कार्यकर्त्यांनी स्थापना केलेली आणि सहकार तत्वाच्या भक्कम आधाराने पथदर्शक व नेत्रदीपक कामगिरी बजावून हिरकमहोत्सवाकडे वाटचाल करणारी महाराष्ट्राच्या सागरी मासेमारी क्षेत्रातील ही संस्था सन १९४४ साली स्थापन झाली. संस्थेचे आद्यप्रर्वतक क्रांतीकारी स्वातंत्रसैनिक कै. नारायण दांडेकर हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असतांना गरीब मच्छीमारांची मासळींच्या दलालांकडून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी प्रथम सात बोटींच्या गटाची मासळी स्वत: व्यापाऱ्यांच्या भावाने खरेदी व विक्र ी करून त्यात मोठा फायदा आहे हे मच्छीमाराना प्रत्यक्ष पटवून दिले व त्यांच्यात विश्वास निर्माण केला.
संस्थेच्यावतीने मासेमारी जहाज बांधणी प्रकल्प मत्स्यव्यवसाय खात्याच्या सहकार्याने हाती घेतला असून १९४७ साला पासून आजही तो सुरु आहे. त्याच दरम्यान संस्थेच्या सभासदाच्या बोटीला इंजिन बसवून त्यांच्या यांत्रिकीकरणांचा पायाही घातला. संस्थेच्या सभासदांना व्यवसायासाठी जिल्हा बँकेकडून २ कोटीपर्यंत कर्ज मिळवून देऊन त्या कर्जाची मुदतपूर्व १०० टक्के परतफेड करणारी एकमेव संस्था असून ‘अ’ आॅडिट वर्ग सतत मिळवीत आली आहे. ग्रुप बोटधारकांना शासनाच्यावतीने यांत्रिकीकरण, आधुनिक उपकरणे, बोटीत अत्याधुनिक शीतपेट्या बसविणे, आपद्ग्रस्त बोटधारकाना 2 लाखापर्यंत आर्थिक मदत देणे, अल्पदरात बर्फ, डिझेल, मच्छिमार साहित्य देण्याबरोबरच मच्छिला रास्त भाव मिळवून देणे ही कार्ये संस्था करीत आहे. त्याबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

पालघरची शान वाढली
यावेळी विधानसभा अध्यक्ष रीभाऊ बागडे , सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख तसेच अनेक खासदार , आमदार उपस्थित होते. या पुरस्कारामुळे पालघर जिल्ह्याच्यी व मच्छीमार समाजाची शान संपूर्ण देशात उंचावली आहे.

Web Title: The pride of Satpati Fisheries Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.