‘श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ची वसईमध्ये प्राथमिक फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:00 AM2018-08-28T05:00:25+5:302018-08-28T05:00:53+5:30

यावर्षी पुन्हा ‘श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ या पाककला सोहळयाचं आयोजन मिती क्रि एशन्स तर्फे करण्यात आलं आहे. दादर, डोंबिवली, वसई, पनवेल, नेरूळ, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, चिपळूण आणि

The primary round of 'Shravanamohotsav 2018 Maharashtra tour' in Vasai | ‘श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ची वसईमध्ये प्राथमिक फेरी

‘श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ची वसईमध्ये प्राथमिक फेरी

googlenewsNext

वसई : यावर्षी पुन्हा ‘श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ या पाककला सोहळयाचं आयोजन मिती क्रि एशन्स तर्फे करण्यात आलं आहे. दादर, डोंबिवली, वसई, पनवेल, नेरूळ, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, चिपळूण आणि पुणे अशा दहा शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेची नववी प्राथमिक फेरी वसई शहरात यंग स्टार्स ट्रस्ट यांच्या सहकार्याने दिनांक २९ आॅगस्ट २०१८ दुपारी २ वाजता, समाज उन्नत्ती मंडळ, माणिकपूर, वसई रोड येथे होणार आहे. या कार्यक्र मास यंग स्टार्स ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर आणि प्रकाश वनमाळी यांचे विशेष सहकार्य आहे. श्रावणमहोत्सव - वसई सेंटरचे सिटी हेड विजय वर्तक आणि मकरंद सावे हे आहेत. वसई सेंटरमध्ये भाग घेण्यासाठी स्वाती जोशी ९४२३०२७६३१ या क्र मांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. या दिवसात मका हा सर्व ठिकाणी उपलब्ध देखील असतो. पावसाळा आणि मक्याचे भाजलेले कणीस यांचं तर सॉलिड समीकरणंच आहे. भुरभुर पाऊस पडत असताना मक्यापासून बनणाऱ्या खमंग आणि रुचकर पदार्थांची लज्जतच न्यारी. म्हणूनच यावर्षीचा या स्पर्धेचा विषय ‘मक्यापासून बनवलेला एक पदार्थ’ असा आहे. दिलेला पदार्थ महिलांनी घरीच बनवून आणायचा आहे व त्याची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन करायची आहे. शेफ तुषार प्रीती देशमुख आणि उत्तरा मोने या श्रावणमहोत्सवाच्या प्राथमिक फेºयांचे मुख्य परीक्षक आहेत. एकूणच पदार्थाची चव आणि सजावट यावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून असेल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. या स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रत्येक शहराच्या नेमलेल्या हॉलमध्ये घेतली जाईल. प्राथमिक फेरीतून प्रत्येक शहरामधून ५ महिलांची निवड केली जाईल.या ५ विजेत्या महिलांना मिळणार पितांबरी रु चियाना, तन्वी हर्बल्स आण िविको यांची आकर्षक गिफ्ट हँम्पर्स, या शिवाय उपस्थित सर्व महिलांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून फोंडाघाट फार्मसी, एस्सले वर्ल्डचे फ्री पासेस, सुपर ड्राय, केसरी टूर्स आणि आस्वाद उपाहार व मिठाई गृह यांची आकर्षक गिफ्ट हँम्पर्स दिली
जातील.
या स्पर्धेची निर्मिती गेले पंचवीस वर्ष इव्हेंट्स आणि मिडिया या क्षेत्रात कार्यरत असणार्या उत्तरा मोने यांच्या मिती क्रि एशन्सची आहे.

‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ कोण ची उत्सुकता शिगेला
च्श्रावणमहोत्सव या पाककला स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक ८ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईतील कोकणेज कोहिनूर या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्युटच्या किचन मध्ये होणार आहे.

च्महाअंतिम सोहळा दिनांक ९ सप्टेंबर २०१८ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे दुपारी ३ वाजता होणार आहे.
च्श्रावण महोत्सव २०१८ या स्पर्धेतून ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे.
च्तसंच महाराष्ट्राच्या किचन क्वीनला मिळणार आहे केसरीची ‘माय फेअर लेडी’ ही टूर. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.


पाककला सोहळा : हितेंद्र ठाकूर, प्रकाश वनमाळी यांचे सहकार्य

Web Title: The primary round of 'Shravanamohotsav 2018 Maharashtra tour' in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.