राज्याचे कृषी प्रधान सचिव शेतीच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:53 AM2020-07-03T02:53:23+5:302020-07-03T02:53:32+5:30
आंबेदा गावातील कोंडीराम पावडे यांच्या शेतातील एस.आर.टी. भात लागवड व चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिकास सहभाग नोंदवल्यानंतर प्रधान सचिवांनी मनरेगाअंतर्गत आंबा, चिकू, मोगरा लागवड पाहणी केली.
कासा : कृषी सप्ताहानिमित्त पालघर जिल्हा कृषी विभागामार्फत पालघर तालुक्यातील व कासा भागातील आंबेदा येथे मंगळवारी एस.आर.टी. भात लागवड व चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. ते स्वत: शेतकऱ्यांसोबत भात लागवड प्रक्रि येत सहभागी झाले होते.
आंबेदा गावातील कोंडीराम पावडे यांच्या शेतातील एस.आर.टी. भात लागवड व चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिकास सहभाग नोंदवल्यानंतर प्रधान सचिवांनी मनरेगाअंतर्गत आंबा, चिकू, मोगरा लागवड पाहणी केली. त्यानंतर शेती शाळेत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापर करणे गरजेचे आहे. नियंत्रित लागवड, हिरवळीचे खत, भात पिकांच्या अवशेषांचा खत म्हणून वापर केल्याने उत्पादनात वाढ होते. मनरेगा योजनेतून फळबागेची लागवड करावी. कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन या वेळी मार्गदर्शन करताना प्रधान सचिवांनी केला.
या वेळी जिल्हा कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी पीक विमा योजनेचे महत्त्व विशद करताना शेतकºयांनी पीक विमा काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच मनरेगाअंतर्गत शेतकºयांना फळबाग लागवड योजनेची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकºयांनी त्यासाठी नाव नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आल्या. या वेळी मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवर, कृषी पर्यवेक्षक दीपक खोत, जगदीश पाटील व आंबेदा गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.