भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीच्या गोदामावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:22 PM2019-12-16T23:22:34+5:302019-12-16T23:22:42+5:30
सव्वा टन प्लास्टिकसाठा जप्त : मीरा-भार्इंदर महापालिकेची कारवाई
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने मीरा रोडच्या एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात प्लास्टिक पिशव्यांसह बंदी असलेल्या वस्तूंचा सुमारे एक हजार २२५ किलोचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्लास्टिक बंदीसाठी आग्रही असताना, तसेच राज्यात प्लास्टिकबंदी लागू असताना भाजपच्याच महिला पदाधिकाºयाच्या पतीचे हे गोदाम असल्याचे समोर आले आहे.
प्लास्टिक ही शहरांतील मोठी समस्या बनली आहे. हे प्लास्टिक खाऊ न गायी, कुत्रे आदी भटक्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे. नाले-खाड्या जाम होऊन प्रदूषण वाढले आहे. प्लास्टिकमधून अन्न-पेय घेतल्याने मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.
मात्र, मीरा-भार्इंदरमध्ये भाजपचीच सत्ता असतानाही प्लास्टिक वस्तूंची विक्र ी आणि वापर सर्रास सुरू आहे. याविरोधात सतत तक्र ारी होत असूनही महापालिकेचे मुकादम, स्वच्छता निरीक्षक व अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. तक्र ार आलीच तर थातुरमातुर कारवाई केली जाते.
मीरारोडच्या १५ क्रमांक बसस्थानका जवळील गौरव रिजेन्सी इमारतीत डी. के. ट्रेडर्स या नावाने प्लास्टिक विक्र ी आणि गोदामातून बंदी असलेल्या पिशव्या आदी वस्तूंची खुलेआम विक्र ी केली जात असल्याची माहिती आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे देण्यात आली.
आयुक्तांनी याप्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांना कल्पना न देता शेजारील प्रभाग समतिी क्र . ६ च्या पथकास कारवाईचे आदेश दिले. या पथकाने गोदामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह कंटेनर आदींचा मोठा साठा आढळून आला
आहे.
आयुक्तांना प्लास्टिक साठा सापडल्याची माहिती दिल्यावर त्यांनी स्थानिक प्रभाग समिती क्र . ४ चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड आणि पथकास पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले. त्यांनी या गोदामामध्ये सापडलेला बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा साठा जप्त करून दुकान चालकाकडून पाच हजारांचा दंड वसूल केला.
जप्त मालाची नोंद करणे सुरू होते. तर जप्त मालाची पक्की खरेदी बिले सादर करण्यास दुकानदारास सांगितले आहे. या कारवाईवरून स्थानिक अधिकाºयांचे प्लास्टिकबंदीकडे झालेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.
पालिकेकडूनच उल्लंघन होत असल्याचा आरोप
विक्र ी गोदाम हा सुमारे दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. ते भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव रूपम झा यांच्या पतीचे आहे. तर या गोदामासमोरच भाजपच्या नगरसेविका रु पाली मोदी यांचे कार्यालय आहे. तर शहरात सर्वत्र बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर व विक्र ी सुरू असून सर्वांवरच कारवाई झाली पाहिजे असे रु पम झा म्हणाल्या. तर कारवाईवेळी संतप्त दुकानदारांनी तर महापौर स्पर्धेवेळी पालिकेकडूनच सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक ग्लास, प्लेट, चमचे आदींचा वापर केला गेला होता असा आरोप करत त्याचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट केला.