वसईमध्ये लेडिज बारवर छापा

By Admin | Published: June 14, 2016 12:26 AM2016-06-14T00:26:15+5:302016-06-14T00:26:15+5:30

वसईत नव्यानेच स्थापन झालेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेने नवघर-माणिकपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरु असलेल्या हॉटेल पॅलेस आणि हॉटेल अंजलीवर

Print to Ladies Bar in Vasai | वसईमध्ये लेडिज बारवर छापा

वसईमध्ये लेडिज बारवर छापा

googlenewsNext

वसई : वसईत नव्यानेच स्थापन झालेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेने नवघर-माणिकपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरु असलेल्या हॉटेल पॅलेस आणि हॉटेल अंजलीवर धाड टाकून त्या ठिकाणी फ्री सर्व्हिस आणि लेडीज आॅर्केस्ट्राच्या नावाखाली बारबाला करीत असलेल्या अश्लिल कृत्याचा पर्दा फाश केला. यावेळी १८ बारबालांना ताब्यात घेण्यात आले.
अंबाडी रोड येथे पॅलेस आणि रेल्वे स्टेशननजिक असलेल्या अंजली या दोन लेडीज बारमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून लेडीज आॅर्केस्ट्रा सुरु
आहे. दोन्ही बार लेडीज फ्री सर्व्हिससाठी वसईत प्रसिद्ध आहेत. फ्री सर्व्हीसच्या नावाखाली याठिकाणी बारबाला अश्लिल कृत्य करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांनी आपल्या पथकासह साध्या वेशात ग्राहक बनून काल रात्री दहाच्या सुमारास सापळा रचला होता.
या दोन्ही बारमध्ये एकाच वेळी छापा टाकण्यात आला. यावेळी बारबाला अश्लिल चाळे करीत असल्याचे आढळून आले. यावेळी १८ बारबालांना ताब्यात घेऊन त्यांचवर बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट ११० अन्वे कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भगत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांच्या पथकात समावेश होता. (प्रतिनिधी)


अपहरण व बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले
तालुक्यात अपहरण, अल्पवयीन मुले-मुली यासह मोठी माणसे बेपत्ता होण्याच्या घटनांंमध्ये वाढ झाल्याचे लक्षात घेऊन नुकतीच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखा सुुरु करण्यात आलेली आहे. गेल्या पाच महिन्यात वसई तालुक्यातून ३४ लहान मुले आणि ४५१ मोठी माणसे हरवलेली आहेत.
अपहरणाच्या ७५ तक्रारी दाखल आहेत. शाखा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी एका अल्पवीन मुलाचा शोध घेण्यात यश मिळवले होते. हा मुलगा पुणे येथील बालगृहात नाव बदलून राहत होता.
सध्या अशा दहा केसेसचा तपास शाखेकडे सोपवण्यात आला आहे. वसईच्या शाखेत दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, एक पोलीस हवालदार असा कर्मचारी वर्ग देण्यात आलेला आहे.

Web Title: Print to Ladies Bar in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.