सोपाऱ्यात हिंदुत्ववाद्यांनी घेतली वैभव राऊत समर्थनार्थ सभा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:59 AM2019-02-04T03:59:02+5:302019-02-04T04:00:56+5:30
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांची सरेआम कत्तल होत आहे. त्याच बरोबर बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्याही वाढत चालल्या आहेत.
वसई - राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांची सरेआम कत्तल होत आहे. त्याच बरोबर बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्याही वाढत चालल्या आहेत. या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी रविवारी नालासोपारा शहरात हिंदु गोवंश रक्षा समिती व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. तिला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थीत होते. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोरक्ष कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या वैभव राऊत याला महाराष्ट्र दहशतवादी पथकाकडून अटक झाल्यामुळे नालासोपारा शहर प्रकाशझोतात आले आहे. वैभवला एटीएसने त्याच्या घरातून अटक करतांना बॉम्ब व विस्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. मात्र एटीएसची हि कारवाई बोगस असल्याचा दावा करून तिचा निषेध करीत वैभवला समर्थन देणाºया विविध संघटनांनी याअगोदर १७ आॅगस्टला दहा हजारांहून अधिक लोकांचा मोर्चा काढून नालासोपारा हादरवून सोडले होते. ९ सप्टेंबर रोजी त्याला समर्थन देणा-या विविध संघटनांनी सोपा-रा गावात जाहिर जनसंवाद सभेचे आयोजन केले होते.|
हिदुत्ववाद्यांवरील आरोपा विरोधात विविध संघटनांनी यावेळी हजेरी लावली होती. वैभवच्या अटकेनंतर पुन्हा नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांच्या हत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत चाललेली संख्या ,धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांचे प्रकार यांचे प्रमाण वाढत असतांना पोलीस आणि प्रशासनकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदू धर्मीय यांवरील या आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, यासाठी रविवार संध्याकाळी नालासोपारा पश्चिम येथील पाटणकर मार्गावरील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर हिंदु गोवंश रक्षा समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. या सभेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅड. संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, शहर चिटणीस मनोज बारोट आदि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.