मिरवणुकीत डीजेच्या कानळ्या
By admin | Published: October 13, 2016 03:19 AM2016-10-13T03:19:35+5:302016-10-13T03:19:35+5:30
या वर्षी दसरा मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठला गेल्याने उत्सवाला गालबोट लागले आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दसरा मिरवणुकीत डिजेचा अनिर्बंध वापरावर आळा
डहाणू/बोर्डी : या वर्षी दसरा मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठला गेल्याने उत्सवाला गालबोट लागले आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दसरा मिरवणुकीत डिजेचा अनिर्बंध वापरावर आळा घालण्यात प्रशासन हतबल ठरले आहे. दरम्यान उत्सवकाळात जिल्हयातील पोलीस यंत्रणेला हाताळण्यात पोलीस अधीक्षक शारदा राऊत अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गणेशोत्सव मिरवणुकीत आवाज वाढीव डीजे तुला आईची शपथ हाय...म्हणून, तर दसरा मिरवणुकीत डॉल्बीवाल्या बोलव माङया डिजेला अशा आरोळ्या रात्री उशिरापर्यंत देऊन उत्सव काळात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठला गेला. या कांठळ्या बसविणाऱ्या आवाजाने रंगाचा बेरंग केला. विविध धार्मिक सण-उत्सव साजरे करताना संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याची परवानगी घेतली जाते. तर उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांकडूनही गावागावात नागरिकांच्या बैठका घेतल्या जातात. या वेळी उत्सव काळात घ्यावयाची काळजी आणि जबाबदाऱ्या या विषयी सूचना दिल्या जातात. उत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळांकडून विविध नियम पाळण्याविषयी लिखित हमी घेतली जाते. मात्र मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करून मंडळांनी नियमांना केराची टोपली दाखवली. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्सवापुर्वी गावपातळीवर पोलीस-नागरिक समन्वयाच्या सभांना पोलिसांकडूनच हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील मिरवणुकी प्रमाणेच मंगळवारी दसरा मिरवणुकी दरम्यान रात्री उशिरापर्यंत कांठळ्या बसविणाऱ्या डिजेच्या आवाजाने नागरिकांना बेहाल केले. (वार्ताहर)