पर्यावरण संवर्धनकडून परिवहनचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:58 PM2019-03-11T22:58:48+5:302019-03-11T22:59:02+5:30
वीस नागरिकांचा मृत्यू; ठेकेदाराचा ठेका रद्द करुन महापालिकेने ताब्यात घ्यावा
वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे महानगरपालिका परिवहन बसखाली सापडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पालिका मुख्यालयासमोर सोमवारी संध्याकाळी श्रद्धांजिल वाहण्यात आली. परिवहनच्या बसखाली सापडून मृत पावलेल्या विस निष्पाप मृत व्यक्तींना सर्वस्वी परिवहनचा खाजगी ठेकेदार जवाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात आला.
पालिका आयुक्तांना निवेदन देत ठेकेदाराचा ठेका रद्द करून परिवहन सेवा पालिकेने स्वत: हाती घेऊन चालवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समन्वयक समीर वर्तक, आगरी सेनेचे कैलाश पाटील, मॅकेन्झी डाबरे, अॅड. खलील शेख, प्रहारचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव, विक्र ांत चौधरी, एस टी कामगार युनियनचे सोहन नाईक, पायस मच्याडो, डेरिक फुर्ताडो, दर्शन राऊत, यज्ञेश कदम, फारूक मुल्ला, अॅड. झहीर शेख, विकी लोपीस, डिक्सन, आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बारा दिवसांपूर्वी भुईगांव येथील कमल गोविंद जोशी या महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. परिवहनच्या बसखाली सापडून तब्बल वीस नागरिकांचा बळी गेल्यानंतरही परिवहनच्या ठेकेदाराला जाग न आल्यामूळे पर्यावरण संवर्धन समितीतर्फे सोमवारी मृत कमल जोशी यांच्या तेराव्याला श्रद्धांजली कार्यक्र म मुख्यालयासमोर ठेवला होता. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट मार्फत चालविली जाते.
पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आजच निवेदन देण्यात आलेले आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- बळीराम पवार, आयुक्त,
वसई विरार शहर महानगरपालिका