तलासरीची आमसभा संपामुळे लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:07 AM2018-02-23T02:07:31+5:302018-02-23T02:07:31+5:30
तालुक्याच्या विकास योजना राबविणे व त्यावर चर्चा करण्यासाठी महत्वाची असलेली २२ फेब्रुवारीला ठेवलेली तालुक्याची
सुरेश काटे
तलासरी : तालुक्याच्या विकास योजना राबविणे व त्यावर चर्चा करण्यासाठी महत्वाची असलेली २२ फेब्रुवारीला ठेवलेली तालुक्याची आमसभा कर्मचाºयांच्या संपामुळे बारगळली आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास घेतला सोडला तर तालुक्याच्या विकासासंदर्भात चर्चा करता येत नसल्याने जनतेने संताप व्यक्त केला
डिसेंबर अखेर पर्यंत आमसभा घेणे गरजेचे असताना फेब्रुवारी महिना संपत आला तरी आमसभा घेण्यास अधिकारी वर्ग टाळाटाळ करीत होता पण गुरु वारी आमसभा घेण्याचे ठरले अन ती रद्दही झाली.
पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक यांनी गुरु वारी संपाचे हत्यार उगारल्याने गुरु वारी होणारी तलासरी तालुक्याची आमसभा रद्द करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी राहुल धूम यांनी दिली तलासरी तालुका विकासाबाबत कोसो दूर आहे.
अनेक विकास योजना लोकांपर्यंत पोहोतच नाहीत, याबाबत नागरिक अधिकाºयाना जाब विचारणार होती ,पण आमसभा रद्द झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध खदानी त्यात होणारा स्फोटकाचा वारेमाप वापर, मुख्यमंत्री सडक योजने ची निकृष्ट कामे, यावर अधिकाºयांना धारेवर धरण्यात येणार होते पण आमसभाच रद्द झाल्याने आला पुन्हा आमसभेला मुहूर्त केव्हा मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष आहे.