दापचरी प्रकल्पग्रस्तांची घरपट्टीसाठी वणवण
By admin | Published: January 10, 2017 05:31 AM2017-01-10T05:31:31+5:302017-01-10T05:31:31+5:30
डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी येथील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन शासनाने दुग्ध प्रकल्पासाठी कवडीमोलाने संपादीत
डहाणू : डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी येथील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन शासनाने दुग्ध प्रकल्पासाठी कवडीमोलाने संपादीत करून त्यांना विस्थापित केले. त्यांचे योग्य पुनर्वसन न केल्याने सध्या ते दापचरी नवीन युनिट पाडा येथे राहत असले तरी गेल्या पाच, सहा वर्षांपासून मागणी करूनही दापचरी ग्रामपंचायत त्या घरांना घरपट्टी आकारत नसल्याने गोर-गरीब प्रकल्पग्रस्त आदिवासींना सरकारच्या निरनिराळया योजनेपासून वंचित राहण्याचे वेळ आली आहे. घरपट्टीसाठी अडीचशे कुटुंबे सध्या शासनदरबारी रोज हेलपाटे मारत आहेत. शासनाच्या दुग्धविभागाने मुंबई-अहमदाबाद हायवे वर राज्यातला पहिला डेअरी शेड हा महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी १९६० साली येथील हजारो आदिवासींची २६७७ हेक्टर जमीन संपादीत केली. तिच्या भरपाईपोटी शासनाने केवळ ३९ लाख ९६ हजार १३५ रूपये अदा केले. मात्र मुंबई येथील तबेले मालकांनी दिडशे किमी दूर अंतरावर येण्यास निरूत्साह दाखवल्याने शासनाच्या उदसीनतेमुळे हा प्रकल्प बासनात गेला. (वार्ताहर)