जलवाहतूक खात्याकडे मनपाचा रो-रो चा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:37 AM2018-12-20T05:37:53+5:302018-12-20T05:38:10+5:30
गडकरींचा अनुकूल प्रतिसाद : नायगाव खाडीचे रुंदीकरण प्रस्तावित, सर्वार्थाने उपयुक्त
वसई : नायगाव खाडीचे रुंदीकरण करून ठाणे ते वसई खाडीदरम्यान सुरू होणारी नियोजित रो रो सेवा नायगाव खाडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव वसई विरार महानगरपालिकेने केंद्रीय जलवाहतूक खात्याकडे पाठवला आहे. ती सुरू केल्यास या पट्ट्यातील अनेक गावांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वाहतुकीसाठी लागणारा विलंब, वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय या गोष्टी सध्या नित्याच्या झाल्या आहेत. त्या टाळण्यासाठी जलमार्गे मालवाहतूक अर्थात रो रो वाहतुकीचा पर्याय पुढे आला आहे. महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने यासाठी केंद्रीय जलवाहतूक, रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या प्रस्तावाला त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. ठाणे खाडीतून भार्इंदर आणि वसई येथील रो रो सेवेला मंजूरी देण्यात आलेली आहे. मात्र आता ही सेवा वसईपर्यंतच न ठेवता नायगाव खाडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने ठेवला आहे.
कशी असते रो-रो सेवा? नायगाव, जुचंद्र, राजावली, टिवरी, ठाण्याला होईल फायदा च्रो रो सेवा म्हणजे रोड आॅन, रोड आॅफ याचा अर्थ ही वाहतूक कधी रस्ता मार्गे तर कधी जलमार्गे केली जाते. म्हणजे मोठ्या जहाजातून वाहनांचीही वाहतूक केली जाईल. माल व प्रवासी वाहतूक आता जलमार्गाने सुरू होणार आहेत. हा प्रवास पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त असा प्रवास आहे. रस्ते वाहतुकीला आणि रेल्वे माल व प्रवासी वाहतुकीला तो उत्तम पर्याय आहे.
च्याचा फायदा नायगाव, जुचंद्र, मालजीपाडा, राजावली, टिवरी, ठाणे, कल्याण येथील नागरिकांना होऊ तसेच या सेवेचा लाभ वसई पूर्वेकडील अनेक गावांना होणार असून व्यवसायातही मोठी वाढ होऊ शकणार आहे. वसई खाडी ही २१ मीटर रु ंद आहे. मात्र या खाडीची रुंदी ४० मीटपर्यंत वाढवण्यात आल्यास या ठिकाणी ही सेवा अधिक चांगल्या रितीने सुरू करता येणार आहे .