विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:34 PM2020-02-18T23:34:27+5:302020-02-18T23:34:38+5:30

विनोद निकोले : डहाणू बसस्थानक आगार व्यवस्थापकांना सूचना

Provide bus services for students | विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करा

विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करा

Next

डहाणू : मंगळवारपासून सुरू झालेली बारावीची परीक्षा व पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या डोंगरदºयात राहणाºया खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी डहाणू बसस्थानक आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

डहाणूचे आ. निकोले यांनी परीक्षा काळात बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शिष्टमंडळासह स्वत: उपस्थित राहून आगार व्यवस्थापकांकडे मागणी केली. डहाणू व तलासरी भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. येथील विद्यार्थ्यांसाठी बससेवा, उपलब्ध व्हावी, मासिक पास सेवा, इतर सेवेचा लाभ मिळावा. तसेच एस.टी. महामंडळाकडून दोन दोन महिने विद्यार्थ्यांचे पास थांबवून ठेवण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची परवड होत आहे. याबाबत आगार अधिकाऱ्यांना आमदार निकोले यांच्या शिष्टमंडळाने धारेवर धरले. तसेच १२ व १० वी हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थी जीवनातील अतिशय महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असते. यासाठी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. अनेकदा परीक्षा केंद्र लांब असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचायला वेळ लागतो. म्हणून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचावे या दृष्टीने डहाणू बसस्थानक आगार यांची भेट घेऊन बससेवा नियमितपणे वेळेवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याबाबत डहाणू बस आगाराचे वाहतूक निरीक्षक राजू पाटील यांनी बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना परीक्षा काळात बससेवेची गैरसोय होणार नाही याकरिता सर्वच बसचालकांना बस वाहने नियमितपणे आणि वेळेवर
ने-आण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे सांगितले. या वेळी आमदार निकोले यांच्यासह किसान सभा डहाणू तालुका अध्यक्ष कॉ.चंद्रकांत घोरखाना, डहाणू शहर युनिट सेक्रेटरी कॉ. धनेश अक्रे,
डोंगरीपाडा सेक्रेटरी विजय वाघात आदी उपस्थित होते.
 

Web Title: Provide bus services for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.