भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:33 AM2019-08-12T01:33:49+5:302019-08-12T01:37:37+5:30

तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो.

Providing health wealth from the path of devotion | भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

भक्तिमार्गातून लाभले आरोग्य धनसंपदेचे देणे, बावीस वर्षांपासूनचा उपक्रम

Next

- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : तब्बल बावीस वर्षांपासून दर मंगळवारी महालक्ष्मी गडावर जाऊन दर्शन घेण्याचा उपक्र म डहाणूतील मंगलग्रुपतर्फे राबविण्यात येतो. या गडावरील ८५० पायऱ्यांची चढउतार केल्याने व्यायाम होऊन उत्तम आरोग्य धनसंपदेचा आशीर्वाद लाभल्याची भावना या ग्रुप सदस्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर गडाची स्वछता आणि परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्याकडून राबवला जातो.
डहाणू रोडपासून महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी वधणा येथे पोहचण्याकरिता १८ कि.मी.चे अंतर असून याकरिता तालुक्यातील विविध भागातून ग्रुप सदस्य मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता येथे दाखल होतात. तेथून एक किलोमीटर पायी चालल्यानंतर पायºया सुरू होतात. ८५० पायऱ्यांच्या चढाईनंतर साधारणत: पाऊण तासांनी माथ्यावरील मंदिरात पोहचता येते. तेथे अभिषेक आणि आरतीचा कार्यक्र म आटपून हा ग्रुप माघारी परततो.
२२ वर्षांपूर्वी शहरातील सरावली येथे राहणाºया अशोक राजपूत यांनी महालक्ष्मी भक्तांना एकत्र करून हा पायंडा पाडला. दर मंगळवारी हा उपक्र म राबविला जात असल्याने ग्रुपचे नामकरण मंगलग्रुप करण्यात आले. हा ग्रुप लवकरच दोन तपांचा टप्पा गाठणार आहे. या कालावधीत अनेक नवीन सदस्य ग्रुपशी जोडले गेले, तर काही कमी झाले. मात्र या भक्ती मार्गातून सुरू झालेल्या प्रवासात ध्यान साधना तसेच संघटनेचे महत्त्व त्यांना उमगले असून त्यांना सामाजिक भानही आले आहे. त्यातूनच गड परिसरात स्वछता, वृक्षारोपण आदी उपक्रम त्यांच्याकडून राबविले जात आहेत. शिवाय चढाई करताना १७०० पायºयांच्या चढ-उताराने व्यायाम होऊन उत्तम आरोग्याचे देणं त्यांना लाभले आहे.
दरम्यान, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा हे भक्त दर्शनाला जातात. शिवाय श्रावणी सोमवारी रात्री साडेआठ वाजता हे सदस्य गडावर जाऊन अभिषेक आणि भजन कीर्तनाचा कार्यक्र म मध्यरात्रीपर्यंत करून तेथेच वस्तीला राहतात. त्यानंतर मंगळवारी पहाटे काकड आरतीनंतर घराकडे मार्गस्थ होतात. तर अश्विन महिन्यात येणाºया नवरात्रीला प्रत्येक दिवशी पहाटे गडावर जाताना, अन्य नागरिकही त्यांच्यासोबत सहभागी होतात.

महालक्ष्मी माता हे जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा आहे. २२ वर्षांपासून गडावर दर्शनाला जाताना भक्तीच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती सदस्यांना लाभली आहे. शिवाय स्वच्छता आणि वृक्षारोपण या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान वाढीस लागले. त्याचा फायदा प्रत्येक सदस्याच्या व्यक्तिमत्वातून जाणवत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी हा आरोग्यदायक भक्तीमार्ग अवलंबवयास हवा. - अशोक राजपूत, संस्थापक, मंगल ग्रुप

Web Title: Providing health wealth from the path of devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.