दोन किमी मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:54 AM2019-04-07T00:54:52+5:302019-04-07T00:55:00+5:30
हजारो नागरिकांचा सहभाग : सामूहिक प्रतिज्ञेतून बांधीलकी जपण्याचा निर्धार, शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
बार्डी : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता निवडणूक आयोगाने कंबर कसली असून जनजागृतीकरीता शुक्रवारी मानवी साखळीचे आयोजन केले होते. डहाणू विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पारनाका समुद्रकिनारी हा उपक्रम राबविण्यात आला.
पारनाका येथील पटांगणावर शुक्र वारी सकाळी आठ वाजता या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेजचे सातशे विद्यार्थी, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील महसूल, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, डहाणू नगरपरिषद आदी. शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या निवडणुकीत मतदान करण्याकरीता मतदारांना जागृती करण्याकरीता तसेच प्रत्येकाने मतदान करण्याचा निर्धार उपस्थितांनी प्रतिज्ञा घेऊन केली. लगतच्या किनाऱ्यावर विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाचा ध्वज व बोधचिन्हाची प्रतिकृती निर्मिली होती. त्या ठिकाणांपासून उत्तर दिशेला सुमारे दोन किमी लांबीची मानवी साखळी केली होती.
डहाणू विधानसभेची जय्यत तयारी
डहाणू विधानसभा क्षेत्रात डहाणू व तलासरी या दोन तालुक्यतील मिळून २,६६,३५७ एकूण मतदार आहेत. ं१,३१,९६९ स्त्रिया, १,३४,३६९ पुरु ष आणि ४ तृतीयपंथीय अशी संख्या असून १५ पुरु ष मतदारांची टपाली मतं असणार आहेत. ही निवडणुकीची प्रक्रि या सुनियोजितरित्या पार पाडण्याकरिता २७०० निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.