भूकंपग्रस्त गावांत जनजागृती; एनडीआरएफ, नागरी संरक्षण दलाचे मिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:12 AM2019-02-15T00:12:42+5:302019-02-15T00:14:48+5:30
डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या भूकंपग्रस्त गावांमधील रहिवाशांमध्ये असलेली भिती कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहेत.
डहाणू : डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या भूकंपग्रस्त गावांमधील रहिवाशांमध्ये असलेली भिती कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहेत. या कार्यक्र माचा एक भाग म्हणून १२ ते २१ फेब्रुवारी दरम्यान तालुक्यातील भूकंपग्रस्त गावांमध्ये एनडीआरएफ आणि नागरी संरक्षण दला कडून जनजागृती करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयामार्फत आयोजित हा उपक्र म स्थानिक ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांच्या एकत्रित समन्वयाने राबविला जाणार आहे. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय विद्यार्थी आदींनी उपस्थित राहून माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी चिंचले येथे सकाळी १० ते १ तर सासवंद येथे दुपारी २ ते ५ या वेळेत जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी आंबेसरी येथे सकाळी १० ते १ तर नागझरी येथे दुपारी २ ते ५, दि. १४ फेब्रु. रोजी धामणगाव येथे सकाळी १० ते १ तर गांगणगाव येथे दुपारी २ ते ५ दि. १५ फेब्रु. रोजी चारोटी येथे सकाळी १० ते १ तर कासा येथे दुपारी २ ते ५ दि. १६ फेब्रुवारी रोजी रानशेत येथे सकाळी १० ते १ तर वधना येथे दुपारी २ ते ५ दि. १८ फेब्रु. रोजी विवळवेढे येथे सकाळी १० ते १ तर गंजाड येथे दुपारी २ ते ५ दि.२० फेब्रु. रोजी आंबोली येथे सकाळी १० ते १ तर शिसणे येथे दुपारी २ ते ५ आणि दि. २१ फेब्रु. रोजी धानिवरी येथे सकाळी १० ते १ तर ओसरविरा येथे दुपारी २ ते ५ या वेळेत जनजागृती कार्यक्र म आयोजित करण्यात आल्याचे डहाणू तहसीलदारांनी सांगितले.