उकाड्याने जनता हैराण...शीतपेयांसह आइसस्क्रीमलाही मागणी
By admin | Published: March 30, 2017 05:14 AM2017-03-30T05:14:49+5:302017-03-30T05:14:49+5:30
तालुक्यात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता खूपच वाढू लागली असून उष्णतेमुळे लाहीलाही होते आहे
हुसेन मेमन / जव्हार
तालुक्यात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता खूपच वाढू लागली असून उष्णतेमुळे लाहीलाही होते आहे. अचानक आभ्रट तर कधी कडक उन या विषम हवामानामुळे, जीव हैराण करणारा उकाडा निर्माण झाला आहे. उन्हापासून व उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यसाठी सर्वजण लस्सी, आमरस, ताडगोळे, कलिंगड, आईस्क्रीम, बरफ गोल,े शीतपेय अशा थंड पदार्थाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मार्च, एप्रिल व मे महिना म्हटलं की, कडक उन्हाळा सर्वांनाच जाणवतो. परंतु गेल्या काही वर्षापासून ऋ तूमानच बदलत असल्याने पावसाळा व हिवाळा कमी कमी होत चालला आहे. तर उन्हाळा वाढू लागला आहे. या वर्षी तर पालघर जिल्ह्यात काही तालुके भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. गेल्या महिन्याभरापासून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमान वाढले आहे. त्यामुळे जीव हैराण करणाऱ्या उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी लहानथोर मंडळी विविध प्रकाराचे उपाय करीत आहेत. शहरातील मंडळींना सावली अथवा फॅनचा आधार वाटतो तर ग्रामीण भागातील लोकांना झाडाच्या सावलीचा निवारा भुरळ घालतो. दुपारच्या कडक उन्हात हॉर्न वाजवत येणारा गारेगारवाला सर्वानाच आकर्षित करीत आहे. कडक उन्हात जिवाला थंडावा मिळण्यासाठी सध्या आईस्क्रिम विक्रेते व बर्फाचे गोळे विकणाऱ्या, गारेगारवाल्यांभोवती तसेच आमरस विक्रेत्यांकडे, लस्सी विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे.
सौराष्ट्रचे प्रसिध्द राजकोट, उपलेटा येथील बर्फाचे गोळे, विक्रेत्यांकडे काडी वाले गोळे, डिश वाले गोळे, मिल्क मेडचे गोळे, ड्रायफ्रुट वाले गोळे, कच्ची कैरी, चॉकलेट, आॅरेज, स्ट्रॉबेरी आदि फ्लेवरमध्ये मिळतात. त्याच बरोबर लिंंबू सरबत व लस्सी ची चलती ही बाजारात जोरात आहे. शहरातील लोक दुपारी, सायंकाळच्या सुमारास गोळे व लस्सी, उसाचा रस, सरबत विक्रेत्यांकडे गर्दी करतांना दिसतात. डिश वाला साधा गोेळा रू. दहा तर ड्रायफु्रट वाला गोळा वीस व काडी वाला साधा गोळा रू. पाच प्रमाणे विकत आहे. तसेच लस्सी दहा हाफ तर बारा रूपये फूल ग्लास, तर मँगो ज्यूस दहा रूपये ग्लास, कलींगड दहा रूपये खाप, ताक बारा रूपये गलास, उस रस दहा रूपये ग्लास असा धंदा तेजीत आहे.
आम्ही खेडोपाड्यातून कामानिमित्ताने तालुक्यालाचार-पाच किलोमिटर वरून पायी येत असतो नंतर बस किंवा खाजगी वाहनातून बाजार करण्यासाठी शहरात येतो, मात्र उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आम्हाला थंड पेयाचा आधार घेऊन गार व्हावे लागते. त्याविना दिवसभराची वणवण शक्यच होत नाही
-रवी खुरकुटे, हेदीचापाडा