कुडूसमध्ये व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद

By admin | Published: May 2, 2017 01:51 AM2017-05-02T01:51:46+5:302017-05-02T01:51:46+5:30

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ व सरकारने गुन्हा मागे घेऊन

The pudding of the traders in Kudos is closed | कुडूसमध्ये व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद

कुडूसमध्ये व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद

Next

वाडा : श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ व सरकारने गुन्हा मागे घेऊन अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी या मागणीसाठी राज्यभर श्रमजीवी संघटना आक्र मक झाली असून त्यांनी कुडूस बंदची हाक दिली होती. या हाकेला कुडूस मधील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोमवारी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
पालघर जिल्हयातील अंगणवाडी कार्यकर्त्यां व मदतनीस यांच्या मागण्यांसाठी २४ एप्रिलला श्रमजीवीने सरकारचे डोहाळे जेवण आंदोलन केले. आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना तीन तास घेराव घातला. त्यानंतर सरकारी कामात अडथळा, धक्कबुक्की व शिवीगाळ करणे अशा आशयाची तक्र ार चौधरी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:हून वाजतगाजत येऊन पोलीस ठाण्यात हजर झाले.
चौधरी यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ कुडूसमधील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून पंडित यांच्या अटकेचा निषेध नोंदवला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. (वार्ताहर)

Web Title: The pudding of the traders in Kudos is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.