सुप्रीमचे टोलनाके बंद करण्याची गर्जना फुसकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:51 AM2018-10-07T05:51:49+5:302018-10-07T05:51:58+5:30

भिवंडी वाडा मनोर या महामार्गाच्या खड्डेमय व अपु-या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने गेल्या बुधवारी खंडेश्वरी नाका येथे केलेला रास्ता रोको आंदोलन व्यर्थ ठरले आहे.

Puffing off the Supreme tollenas! | सुप्रीमचे टोलनाके बंद करण्याची गर्जना फुसकी!

सुप्रीमचे टोलनाके बंद करण्याची गर्जना फुसकी!

Next

वाडा : भिवंडी वाडा मनोर या महामार्गाच्या खड्डेमय व अपु-या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने गेल्या बुधवारी खंडेश्वरी नाका येथे केलेला रास्ता रोको आंदोलन व्यर्थ ठरले आहे. त्यावेळी सुप्रिम कंपनीने टोल बंद करावे असे आदेश सा.बां. विभागाने दिले होते मात्र, दुसऱ्या दिवशीच पुन्हा टोलच्या पावत्या फाडून त्या आदेशाला केराची टोपली दाखविणाºया सुप्रीम विरोधात तहसीलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भाषा केली होती मात्र ती फुसकी ठरली आहे.
बुधवारच्या आंदोलनाची दखल घेऊन टोल नाके बंद केल्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी मोर्चात दिले होते. मात्र दुसºया दिवशी टोल नाका बंद न करता ते सुरूच होते. हे शिवसैनिकांनी तहसीलदारांच्या लक्षात आणून दिले होते. त्यानंतर लेखी आश्वासन दिल्यानंतरही टोल नाका सुरू असेल तर फौजदारी गुन्हा दाखल करा असे तहसीलदार दिनेश कुºहाडे यांची सांगितले. मात्र, दोन दिवस झाले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.
भिवंडी वाडा मनोर या रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीने केले असून पाच वर्ष उलटूनही हे काम अपूर्ण आहे. वाडा ते भिवंडी दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने संपूर्ण रस्ता उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर वनविभागाच्या जागेतील १६ किमी अंतराच्या रस्त्याचे काम तसेच पिंजाळ व देहर्जे नदीवरील पुलांची कामे अपूर्ण आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी आंदोलन छेडले होते.
त्याची दखल घेत सा.बा. विभागाचे सहाय्यक अभियंता अरविंद कापडणीस यांनी मोर्चा स्थळी जाऊन मोर्चेकºयांशी चर्चा केली. कापडणीस यांनी मोर्चा स्थळी जाऊन मोर्चेक-यांशी चर्चा केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता पवार यांच्याशी चर्चा करून टोल नाके बंद केल्याचे लेखी आश्वासन मोर्चे कºयांना दिले होते. मात्र, दुसºयाच दिवशी सुप्रीम कंपनीने आपली नफेखोरी सुरु केली होती.

कंपनी प्रशासनावर एवढी मेहरनजर कशापायी?
टोल नाके सुरूच असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दुसºया दिवशी तहसीलदार दिनेश कुºहाडे यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लेखी दिलेल्या आश्वासनाचे पालन सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनी करत नसेल तर कंपनीवर गुन्हा दाखल करा असे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला कुºहाडे यांनी सांगितले. दरम्यान, टोल नाके बंद केले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना घेराव घालण्याचा गंभीर इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. या पार्श्वभूमिवर रविवारी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट ठरली आहे.

Web Title: Puffing off the Supreme tollenas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.