विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्बा लोकलमध्ये ठेवा

By admin | Published: January 11, 2017 05:57 AM2017-01-11T05:57:02+5:302017-01-11T05:57:02+5:30

प्रचंड गर्दीमुळे लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामारी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने

Put the reserved dubbings for the students in the local area | विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्बा लोकलमध्ये ठेवा

विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्बा लोकलमध्ये ठेवा

Next

वसई : प्रचंड गर्दीमुळे लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामारी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने त्यांच्यासाठी लोकलमध्ये राखीव डब्बा ठेवण्यात यावा, अशी मागणी आमदार क्षितीज ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी दररोज मुंबईला ये-जा करतात. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: सध्या लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामाऱ्या होऊ लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याकडे आमदार ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यासाठी लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी राखीव डबा ठेवण्यात यावा. तसेच परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल सोडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Put the reserved dubbings for the students in the local area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.