‘पालिकेच्या जागेत स्वतंत्र मंडई द्या!’

By admin | Published: August 10, 2016 02:17 AM2016-08-10T02:17:43+5:302016-08-10T02:17:43+5:30

शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांना चांगला नफा मिळेल यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरात शेतकऱ्यांना

'Put a separate market in the space of the school!' | ‘पालिकेच्या जागेत स्वतंत्र मंडई द्या!’

‘पालिकेच्या जागेत स्वतंत्र मंडई द्या!’

Next


राहुल वाडेकर, विक्रमगड
शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांना चांगला नफा मिळेल यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरात शेतकऱ्यांना स्वतंत्र (मंडई) उपलब्ध करून द्यावी असे साकडे युवास्पर्श या सामाजिक संघटनेने वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रविणाताई ठाकूर यांना घातले असता त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी कामगार नेते महेंद्र ठाकरे, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेविका संगीता भरे, स्वाभिमानी कुणबी सेनेचे पालघर जिल्हा सचिव मिलिंद पाटील हे उपस्थित होते.
एकीकडे शेतकरी दिवसेंदिवस अहोरात्र शेतीत राबत असतो तर दुसरीकडे भात शेतीत म्हणावं तितकं उत्पादन व भाताला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी अत्यंत अस्वस्थ झाला आहे.
तरीही त्याने अजूनही शेतीची जिद्द सोडली नसून तो भविष्यात काहीतरी चांगला नफा मिळेल अशा आशेवर जगून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकीत आहे. भातशेतीला पूरक म्हणून विविधप्रकारचा भाजीपाला पिकवत आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वसई-विरार महानगर पालिका ही खूप जवळ असल्याने शेतमाल शेतकरी महानगरपालिकेच्या मंडईत विकू शकतील. ही बाब शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक ठरणार असल्याने महापौरानी स्वत: पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा बाजारपेठे साठी जागा वसई-नालासोपारा-विरार या तिन्ही शहरांत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अध्यक्ष सचिन भोईर, उपाध्यक्ष अमोल सांबरे, कार्याध्यक्ष डॉ.सिद्धार्थ सांबरे व सचिव रूपेश पाटील यांनी महापौरांकड ेनिवेदनाद्वारे ेकेली.

Web Title: 'Put a separate market in the space of the school!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.