10वीच्या विद्यार्थ्यांना 2 तास उशिराने मिळाल्या प्रश्नपत्रिका

By admin | Published: March 16, 2017 03:58 PM2017-03-16T15:58:48+5:302017-03-16T15:58:48+5:30

वाडा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तासांनंतर प्रश्निपत्रिका मिळाल्या. यावर पालकांनी संपात व्यक्त केला आहे.

The question papers given to students of 10th for two hours late | 10वीच्या विद्यार्थ्यांना 2 तास उशिराने मिळाल्या प्रश्नपत्रिका

10वीच्या विद्यार्थ्यांना 2 तास उशिराने मिळाल्या प्रश्नपत्रिका

Next

 ऑनलाइन लोकमत

वाडा, दि. 16 -   चिंचघर  येथील  ह. वि. पाटील  विद्यालयात  दहावी  परीक्षेचे केंद्र  असून  आज  भूमितीचा  पेपर  होता.  मात्र परीक्षा  मंडळाच्या  भोंगळ  कारभारामुळे तब्बल  दोन  तास  उशिराने  प्रश्नपत्रिका  आल्याने  विद्यार्थांना  ताटकळत  बसावे लागले.  या  भोंगळ  कारभार  प्रकरणाने  पालक  चांगलेच  संतापले  आहेत. झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून  संबंधितावर  कारवाई करण्याची मागणी सुरू आहे.
 
तालुक्यातील  सर्व  केंद्रांच्या प्रश्नपत्रिका  वाडा  कस्टडीमध्ये  जावून  घेतल्या  जातात.  चिंचघर येथे  ह.वि.पाटील विद्यालयात  सहा  शाळांचे  823  विद्यार्थी  भूमिती  विषयाची  परीक्षा  देत  आहेत. यातील 129  विद्यार्थी  इंग्रजी  माध्यमाचे  तर  211 विद्यार्थी  सेमी  इंग्रजी  माध्यमाचे  आहेत.  गुरुवारी सकाळी चिंचघर येथील परीक्षा केंद्रावर वाडा येथील कस्टडीमधून सिलबंद प्रश्नपत्रिका आल्यावर नियोजित वेळेत ठरल्याप्रमाणे लिलाफे उघडण्यात आले असता इंग्रजी व  सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्या नसल्याचे केंद्र प्रमुखांच्या लक्षात आले.  
 
त्यानंतर  चिंचघर येथील  शिक्षण  संस्थेचे  सदस्य  श्रीकांत  भोईर  व  नॅशनल  एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  मुस्तफा  मेमन  यांनी  तातडीने  लक्ष  घालून  केंद्र  प्रमुखांकडे चौकशी केली असता  ही  चूक  बोर्डाकडून  झाल्याचे  त्यांच्या  निदर्शनास आले.  पुढील बेजबाबदारपणा म्हणजे केंद्र प्रमुखांसहवरील सर्वांनी धावाधाव केली असता बोर्डाकडून ऑनलाईन एक प्रश्नपत्रिका देण्यात आली.  त्यानंतर तिच्या एका खासगी दुकानातून पेपरची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या. 
 

Web Title: The question papers given to students of 10th for two hours late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.