सोसायटीचा प्रश्न सुटला; सागर प्रकाश इमारतीच्या रहिवाशांनी मानले लोकमतचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:46 PM2019-06-05T22:46:59+5:302019-06-05T22:47:13+5:30
तोडगा काढण्याचे दिले आश्वासन : १२६ परिवाराने मानले लोकमतचे आभार
नालासोपारा : पूर्वेकडील गाळानगर परिसरातील सागर प्रकाश इमारतीच्या पुनर्विकासामध्ये ५ आडमुठ्या परिवारामुळे १२६ परिवार वेठीला या मथळ्याखाली बातमी दैनिक लोकमतच्या अंकात छापून आली आणि गेल्या ४ महिन्यापासून लटकलेल्या इमारतीच्या पूनर्विकासाचा प्रश्न वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांनी २ दिवसांच्या आत तोडगा काढण्याचे आश्वासन समस्त सोसायटीच्या पदाधिकारी आणि सभासदांना सोमवारी दिल्यानंतर प्रश्न सुटला आहे. वेठीस अडकलेल्या १२६ परिवाराने प्रश्न सुटल्यावर दैनिक लोकमतमध्ये बातमी छापून आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होऊन तोडगा काढल्यामुळे तोंड भरून दैनिक लोकमतचे कौतुक केले आहे.
सागर प्रकाश इमारतीचे पदाधिकारी आणि सभासद असे एकूण ७० जणांनी बस करून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात जाऊन सोमवारी दुपारी आयुक्त बळीराम पवार यांची भेट घेऊन सर्व हकीकत आणि परिस्थिती सांगितली. यावर आयुक्तांनी दोन दिवस थांबण्यास सांगून ६ जूनला पदाधिकारी व काही सभासदांना महानगरपालिकेच्या मुख्यालयात बोलावले असून जे ५ आडमुठे परिवार धोकादायक इमारतीमधून सदनिका खाली करत नाही अशा परिवारांना २४ तासात सदनिका खाली करण्याची नोटीस देऊ व तरीही सदनिका खाली केली नाही तर पोलीस बंदोबस्तामध्ये सदनिका खाली करण्याचे ठोस आश्वासन दिले आणि सर्व सोसायटीच्या पदाधिकारी आणि सभासदांच्या तोंडावर हसू आले आणि आयुक्तांच्या आश्वासनाचे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या ४ ते ५ महिन्यापासून सुरू असलेल्या लढ्याला यश आले आहे. लोकमतने बातमी छापली आणि महानगरपालिका प्रशासन जागे झाले व आम्हाला ५ ही परिवार पोलीस बंदोबस्तात इमारतीमधून बाहेर काढून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. आमच्या सोसायटीकडून दैनिक लोकमतचे खूप खूप आभार. - रंजित कोरडे (खजिनदार)
पाणीपुरवठा विभागाकडून त्या भागात कर्मचारी पाठवून माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्या भागात तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँंकरची व्यवस्था करतो. ग्रामस्थांशी बोलून अधिक काय उपाययोजना करता येईल त्याबाबत चर्चा करु . - एम.आव्हाड, उपाभियंता