जिल्हा मुख्यालय बांधकामाला पाण्याचा प्रश्न
By admin | Published: June 10, 2017 01:01 AM2017-06-10T01:01:37+5:302017-06-10T01:01:37+5:30
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर उभारणीचे काम सिडकोकडे सोपविण्यात आले असून जिल्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर उभारणीचे काम सिडकोकडे सोपविण्यात आले असून जिल्हा मुख्यालयांतर्गत जिल्हाधिकारी, जिल्हा परीषद तसेच जिल्हा पोलीस कार्यालयाच्या बांधकामाच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या पाशर््वभूमीवर व सुर्या प्रकल्पनांतर्गत बिगर सिंचनासाठी यापुढे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्यामुळे जिल्हा मुख्यालय तसेच १ हजार एकरवर उभारण्यात येणाऱ्या पालघर नवनगरसाठी पाणी कोठून उपलब्ध होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघर जवळील कोळगाव-मोरेकुरण येथील शासकीय जमिनीवर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर उभे राहत आहे. या दोन्हीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता आहे.
पालघर व परिसरासाठी सुर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे. मात्र, या सूर्या प्रकल्पांतर्गत एकूण २८५ दलघमी पाणीसाठ्यापैकी तब्बल १८० दलघमी (बिगरिसंचन) पाणी वसई-विरार, मीरा-भार्इंदर साठी आरिक्षत करण्यात आले आहे. तर केवळ ४० दलघमी पाणी (बिगरिसंचन) पालघर व डहाणू तालुक्यासाठी आरिक्षत आहे.
या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी बिगरिसंचनासाठी आरक्षित झाल्यामुळे या प्रकल्पातून सिंचनाखाली अपेक्षित १४,६८६ हेक्टर पैकी ७,६८१ हेक्टर म्हणजे तब्बल १९००० एकर जमीन सिंचनातून वगळली जाणार आहे.